ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ११ - केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यावर त्यांच्या जवळील कंपनीस १० हजार करोड रुपयांच काँट्रेक्ट दिल्याचा आरोप काँग्रेसचे महासचिव दिग्विजय सिंह यांनी केला आहे. आपल्या निकटवर्तीय कंपनीस गडकरी यांनी १० हजार करोड रुपयाचे ठेका दिला आहे , यामध्ये मोठ्याप्रमाण गैरव्यवहार झाले आहेत, त्यामुळे नितीन गडकरी यांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी निलंबित करावे अशी मागणी काँग्रेस तर्फे होत आहे.
गडकरी यांनी जम्मू-कश्मीर मधील जोजिला दर्रेतील सुरंग बनवन्याचे १० हजार ५० करोड रुपयाचा ठेका जवळील निकटवर्तीय कारोबारी दत्तात्रेय महेशकर यांच्या आईआरबी इंफ्रास्ट्रक्चर कंपनीस दिले आहे. महेशकर यांचे आणि नितीन गडकरीच्या मुलाचे चांगले व्यवसाईक संबध आहेत, गडकरी यांच्या पूर्ति ग्रुप कंपनीचे शेअर्स IRB विकत घेत होती.
केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी काँग्रेसच्या सर्व आरोपाच खंडन केल आहे, मी माझ्या कोणत्याही निकटवर्तीय कंपनीला काँट्रेक्ट दिले नाही, माझा अथवा माझ्या मुलाचा त्या कंपनीशी कोणताही संबध नाही असे मत त्यांनी मांडले.