नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वाखालील एक उच्चस्तरीय शिष्टमंडळ लवकरच एक लाख कोटी रुपयांवरील गुंतवणुकीच्या प्रस्तावासह इराण दौऱ्यावर जाणार आहे.इराणमधील युरिया प्रकल्पासाठी लागणाऱ्या वायूच्या किमतीबाबत उभय देशांत सुरू असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर हा दौरा होणार आहे. इराणने २.९५ डॉलर प्रति एमएमबीटीयू या दराने नैसर्गिक वायु देण्याचा प्रस्ताव दिला आहे. तर भारत १.५ डॉलर प्रति एमएमबीटीयू दरावर जोर देत आहे. अमेरिका आणि अन्य पश्चिमी देशांनी इराणवरील प्रतिबंध कमी केल्यामुळे भारताने तेहरानसोबत मिळून चाबहरा बंदरावर वायूआधारित युरिया प्रकल्प स्थापन करण्याची तयारी चालवली आहे. याशिवाय ओएनजीने शोधलेल्या नैसर्गिक वायूचा विकास, महामार्ग व रेल्वे योजनांवरही चर्चा सुरू आहे. गडकरींनी सांगितले की, या योजनांमध्ये एक लाख कोटींपेक्षा अधिकची गुंतवणूक अपेक्षित आहे. सर्व संबंधित विभाग येत्या २८ सप्टेंबरपर्यंत इराणमधील नियोजित योजनाबाबचा अहवाल देतील. (वृत्तसंस्था)इराण १.५ डॉलर प्रति एमएमबीटीयू दराने वायू देण्यास राजी झाल्यास भारतात युरियावर दिली जाणारी ८० हजार कोटी रुपयांच्या सबसिडीत मोठी घट होईल. (वृत्तसंस्था)
गडकरी जाणार इराण दौऱ्यावर
By admin | Published: September 28, 2015 2:26 AM