नवी दिल्ली : देशातील समस्यांचे निराकरण करण्यात नितीन गडकरींचा द्रष्टेपणा मार्गदर्शक ठरणार आहे, अशा भावनांतून केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री गडकरी यांची मुक्तकंठाने प्रशंसा केली. निमित्त होते गडकरी यांच्या विचारावर आधारीत ‘भविष्य का भारत’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ््याचे. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसध्येला महाराष्ट्र सदनात हा प्रकाशन सोहळा झाला. केंद्रीय राज्यमंत्री मनोज सिन्हा, नरेंद्रसिंग तोमर, पियुष गोयल, डॉ. हर्षवर्धन, जन. व्ही.के .सिंग, नजमा हेपतुल्ला यांच्यासह अनेक खासदार आणि विचारवंत उपस्थित होते. पुस्तकाचे लेखक तुहिन सिन्हा आणि प्रकाशक तथा प्रभात प्रकाशनाचे प्रमुख प्रभात कुमार यांनी या लेखनामागील भूमिका स्पष्ट केली. गडचिरोली जिल्हयातील एकलव्य शाळेतील हात व पायाने अपंग असलेल्या शिक्षकाला हे पुस्तक समर्पित करीत असल्याची घोषणा गडकरी यांनी केली, तेव्हा सभागृह भावविभोर झाले होते.‘गडकरी हे अतुलनीय कल्पनाशक्तीचे धनी आहेत.’, असे राजनाथ म्हणाले, तर ‘ देशातील समस्यांचे निराकरण करण्याकरिता गडकरींनी सुचविलेल्या उपाय योजना मार्गदर्शक ठरणाऱ्या आहेत.’ अशा शब्दांत शहा यांनी गौरव केला.राजकारणाचा उपयोग सत्ताकारणासाठी न होता समाजकारणासाठी झाला पाहिजे, अशी भावना गडकरी यांनी यानंतर व्यक्त केली. ग्रामीण भागात उत्तम क्षमतेचे हस्तकला उद्योग आहेत. याचसोबत अन्य स्वदेशी उत्पादनातही ती क्षमता आहे. मात्र त्यांच्यात विश्वास निर्माण करण्याची गरज आहे. त्याच्याशी पूरक अशा आर्थिक सुधारणाकरून भारत देश विकसित राष्ट्र म्हणून उदयाला येऊ शकतो.- नितीन गडकरी, केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री गडकरी हे उत्तम संघटक आहेत. महाराष्ट्रात मंत्री असताना त्यांनी पब्लीक प्रायवेट पार्टनरशिप (पीपीपी) च्या प्रारूपाची मांडणी व यशस्वी अमंलबजावणी केली. देशातील समस्यांची गडकरींना अचूक जाण आहे. - अमित शहा, राष्ट्रीय अध्यक्ष , भाजपा.ग्रामीण भागातील जनतेचा व शेतक-यांचा विकास, ग्रामीणभाग व शहरातील दरी कमी करण्यासाठीचे गडकरी यांचे कार्य या पुस्तकाच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचेल. या पुस्तकाच्या माध्यमातून भविष्यातील विकसीत भारताचे गडकरींनी मांडलेले चित्र सर्वांसाठीच मार्गदर्शक ठरेल.- राजनाथ सिंह,केंद्रीय गृहमंत्री (विशेष प्रतिनिधी)
गडकरींच्या मनातील ‘भविष्य का भारत’
By admin | Published: August 17, 2015 12:45 AM