- शीलेश शर्मानवी दिल्ली : मध्यम, लघु आणि सूक्ष्म उद्योगांचे (एमएसएमई) सरकार पाच लाख कोटी रुपये देणे लागते, असे वक्तव्य केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व एमएसएमई खात्याचे मंत्री नितीन गडकरी यांनी केल्यानंतर राजकीय भूकंप झाला आहे. या भूकंपामुळे सरकारचा प्रामाणिकपणा आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एमएसएमईसाठी केलेल्या घोषणेवर प्रश्नचिन्ह लागलेआहे.माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनी टिष्ट्वटरवर म्हटले आहे की, निर्मला सीतारामन खऱ्या बोलत आहेत की गडकरी? गडकरी यांनी म्हटले आहे की, सरकारकडे सार्वजनिक उद्योग आणि एमएसएमईचे पाच लाख कोटी रुपये थकलेले आहे.निर्मला सीतारामन म्हणतात की, आम्ही एमएसएमईसाठी तीन लाख कोटी रुपयांचे कोलॅटरलमुक्त कर्जाची घोषणा करीत आहोत. प्रश्न असा उपस्थित होतो की, कर्ज देणारा कोण आहे व कर्ज घेणारा कोण? सीतारामन आणि गडकरी यांनी आधी दोघांत ठरवून घ्यावे आणि एमएसएमईला स्वत:चे संरक्षण सरकारच्या मदतशिवाय करू द्यावे, असेही चिदम्बरम यांनी म्हटले.गडकरी यांच्या खुलाशानंतर सरकार आणि सीतारामन यांच्यावर विरोधी पक्षांनीही हल्ला केला आहे. राष्ट्रीय जनता दलाचे खासदार मनोज झा यांनी सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजची थट्टा करताना म्हटले की, ‘२०१५ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमध्ये बोली लावून लावून पॅकेजची घोषणा केली होती. बिहारची जशी घोषणा होती तशीच ही आहे. खोटे बोलणे, लोकांना धोका देणे ही यांची सवयआहे.’केंद्राच्या पॅकेजचा फुगा फुटला -सुरजेवाला20 लाख कोटी रुपयांच्या पॅकेजचा फुगा फुटला, असे काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सूरजेवाला यांनी टिष्ट्वटरवर म्हटले आहे. सीतारामन म्हणतात एमएसएमईला तीन लाख कोटी रुपयांचे कर्ज देणार; पण गडकरी यांनी त्यामागील रहस्यच उघड केले. यालाच म्हणतात टक्कल असलेल्याला कंगवा विकणे, असे ते म्हणाले.7,500 रुपये प्रत्येक खात्यात भरून टाका, असे मत माकपचे नेते सीताराम येचुरी यांनी मांडले आहे. ते तर या घोषणेला पॅकेजच मानायला तयार नाहीत. त्यांचा थेट तर्क होता की, प्रत्येक खात्यात पैसे टाका. उपाशीपोटी व चालून-चालून पायाला भेगा पडलेले लोक यांना दिसत नाहीत.
गडकरींच्या खुलाशामुळे पॅकेजवर प्रश्नचिन्ह, विरोधकांकडून सरकारवर हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2020 6:06 AM