नवी दिल्ली : विमानबंदीने अडचणीत आलेले शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांनी दुसऱ्या टोपण नावाने एअर इंडियाच्या विमानाची तिकिटे मिळविण्यासाठी तीन वेळा प्रयत्न केला; परंतु त्यांचे तीनही प्रयत्न फसले. काहींच्या मते त्यांनी सात वेळा विमानाचे तिकीट काढण्याचे प्रयत्न केले. पण ते यशस्वी झाले नाहीत. मागच्या गुरुवारी एअर इंडियाच्या एका कर्मचाऱ्याला विमानात मारहाण केल्याने देशांतर्गत प्रमुख विमान सेवा कंपन्यांनी खासदार गायकवाड यांना विमान बंदी करण्याचा निर्णय घेतला. खा. गायकवाड यांच्या कार्यालयातील एका कर्मचाऱ्याने त्यांच्यासाठी मुंबई ते दिल्ली हवाई प्रवासासाठी एक तिकीट बुक करण्यासाठी एअर इंडियाच्या कॉल सेंटरला फोन करताना प्रवाशाचे नाव रवींद्र गायकवाड असे सांगितले. रवींद्र गायकवाड यांचे नाव ऐकताच त्यांचे तिकीट रद्द करण्यात आले, असे एअर इंडियाच्या सूत्रांनी सांगितले.त्यानंतर हैदराबाद ते दिल्ली विमानासाठी प्रोफेसर व्ही. रवींद्र गायकवाड या नावाने काढण्यात आलेले तिकीटही रद्द करण्यात आले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
विमान प्रवासासाठी गायकवाड यांचा टोपण नावाने प्रयत्न
By admin | Published: April 01, 2017 1:23 AM