शहरं
Join us  
Trending Stories
1
वंचितने आपणच पाठिंबा दिलेल्या अपक्षाला दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
2
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
3
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
4
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
5
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
7
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
8
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
9
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
10
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
12
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
13
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
14
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
15
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
16
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
17
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
18
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
19
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
20
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान

गजेंद्र चौहान यांचा ‘सीव्ही’ केवळ एका परिच्छेदाचा !

By admin | Published: August 02, 2015 10:40 PM

पुण्यातील प्रतिष्ठित ‘फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडिया’(एफटीआयआय)च्या अध्यक्षपदी अभिनेते गजेंद्र चौहान यांची नियुक्ती वादात सापडली असतानाच

नवी दिल्ली : पुण्यातील प्रतिष्ठित ‘फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडिया’(एफटीआयआय)च्या अध्यक्षपदी अभिनेते गजेंद्र चौहान यांची नियुक्ती वादात सापडली असतानाच, केवळ एका परिच्छेदाच्या बायोडाटाच्या आधारावर या नामांकित संस्थेच्या प्रमुखपदी त्यांची नियुक्ती झाल्याचे समोर आले आहे.माहिती अधिकार कायद्यांतर्गत दाखल अर्जाच्या उत्तरादाखल माहिती व प्रसारण मंत्रालयाने फाईल नोटिंगची प्रत उपलब्ध करून दिली आहे. गजेंद्र चौहान अभिनेते आहेत. ‘महाभारत’ या टीव्ही वाहिनीवरील मालिकेत पांडवांचे सर्वात मोठे बंधू ‘युधिष्ठिर’ची त्यांनी वठविलेली भूमिका अत्यंत गाजली होती. सुमारे १५० चित्रपट आणि ६०० टीव्ही मालिकांमध्ये त्यांनी काम केले आहे, अशी केवळ एका परिच्छेदाची माहिती या फाईल नोटिंगमध्ये आहे.चौहान यांची ज्या शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रतेच्या आधारावर एफटीआयआयच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली, तिच्याबाबत अर्जदाराने माहिती मागितली होती. त्याच्या उत्तरादाखल मंत्रालयाने रेकॉर्डस् उपलब्ध करून दिले आहे. अमिताभ बच्चन, रजनीकांत, विधू विनोद चोपडा, राजू हिराणी, जया बच्चन, रमेश सिप्पी,आमिर खान, गोविंद निहलानी अशा नावांचाही एफटीआयआय प्रमुखपदासाठी विचार करण्यात आला. मात्र यांच्यापैकी गजेंद्र चौहान यांची निवड करण्यात आली, असे मंत्रालयाने म्हटले आहे. या माहितीसोबत चौहान यांचा केवळ एका परिच्छेदाचा बायोडाटा जोडला आहे. या एका परिच्छेदाच्या बायोडाटाव्यतिरिक्त मंत्रालयाने त्यांची कामे आणि उपलब्धींबाबत दुसरी कुठलीही माहिती पुरविलेली नाही. अनेक दिग्गजांच्या नावांमधून गजेंद्र चौहान यांचीच नियुक्ती का करण्यात आली, याला उत्तर देण्याचेही मंत्रालयाने टाळले आहे. चौहान यांच्या नियुक्तीविरोधात एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांनी प्रखर आंदोलन उभारले आहे.अभिनेते अनुपम खेर, रणबीर कपूर, सलमान खान यांच्यासह बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांनी या आंदोलनात उडी घेतली आहे. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीही या विद्यार्थ्यांना पाठिंबा जाहीर केला आहे.