नवी दिल्ली : जगभरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. देशातील कोरोना रूग्णांची संख्या 28 लाखांच्या पुढे गेली आहे. सर्व सामान्य लोकांपासून ते अनेक व्हीव्हीआयपी लोकांना सुद्धा कोरोनाची लागण होत आहे. यातच मोदी सरकारमधील आणखी एका मंत्र्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. याआधी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनाही कोरोनाचा संसर्ग झाला होता.
"अस्वस्थ वाटत होते. त्यामुळे मी कोरोनाची टेस्ट केली. या टेस्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मला रुग्णालयात दाखल केले आहे", असे गजेंद्रसिंह शेखावत यांनी सांगितले. तसेच, गेल्या काही दिवसांत जे लोक माझ्या संपर्कात आले आहेत. त्यांनी स्वत: ला आयसोलेट करून आपली कोरोना चाचणी करून घ्यावी, अशी विनंती करत प्रत्येकाने निरोगी राहा आणि स्वत: ची काळजी घ्या, असे गजेंद्रसिंह शेखावत यांनी ट्विटरच्या माध्यमातून म्हटले आहे.
दरम्यान, गेल्या २४ तासांत देशभरात कोरोनाचे ६९६५२ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर ९७७ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा २८, ३६,९२६ वर जाऊन पोहोचला आहे. यामध्ये ६,८६,३९५ अॅक्टिव्ह रुग्णांचा समावेश आहे. तर आतापर्यंत देशातील २०,९६, ६६५ जणांनी कोरोनावर मात केली आहे. मात्र, ५३,८६६ जणांना कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
आणखी बातम्या...
जिम पुन्हा सुरू करणे आवश्यक; सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
केंद्र सरकारचा मोठा निर्णय, जम्मू-काश्मीरमधून १० हजार जवानांना माघारी बोलविणार
शत्रूला नकळत लष्कराचे जवान लडाखला पोहोचणार, भारताचा नवा मास्टर प्लॅन
यूपीत पुराव्याशिवाय एन्काऊंटर होतायेत, असदुद्दीन ओवैसींचा योगी सरकारवर निशाणा
'सुशांतच्या कुटुंबीयांना न्याय मिळेल', बिहारच्या मुख्यमंत्र्यांची 'सर्वोच्च' निकालानंतर प्रतिक्रिया
भाजपा नेते वसीम बारी यांच्या हत्येचा बदला; लष्कर-ए-तय्यबाच्या कमांडरचा खात्मा
अशोक चव्हाण यांच्या जबाबदारीत वाढ, मुख्यमंत्र्यांचे भाजपाला चोख प्रत्युत्तर
शिक्षकांच्या पगारात २२ टक्क्यांची वाढ, 'या' सरकारने घेतला मोठा निर्णय