नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभरातील ९६७ पोलीस कर्मचा-यांना रविवारी पोलीस शौर्यपदक जाहीर झालीत़ महाराष्ट्रातील हेडकॉन्स्टेबल गणपत नेवरू मडावी यांना मरणोत्तर राष्ट्रपती शौर्यपदक जाहीर झाले़ राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्या जाणाऱ्या या पुरस्कारांची घोषणा केली़ अधिकृत माहितीनुसार, यापैकी २५ पोलीस कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती शौर्यपदक, १३२ जणांना पोलीस शौर्यपदक, ९८ जणांना विशेष उल्लेखनीय सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक आणि ७१२ पोलीस कर्मचाऱ्यांना उल्लेखनीय सेवेसाठी पोलीस पदक मिळाले आहे़२६ कारागृह कर्मचा-यांना राष्ट्रपती सुधारक सेवापदक देशभरातील २६ कारागृह कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती सुधारक सेवापदक (करेक्शनल मेडल) जाहीर झाले आहे़ यात पुण्याच्या येरवडास्थित जाधव कारागृह अधिकारी प्रशिक्षण कॉलेजचे हवालदार रवींद्र राम पवार, येरवडा मध्यवर्ती कारागृहातील जेलर (श्रेणी २) तात्यासाहेब सदाशिव, येरवडा मध्यवर्ती कारागृहाचे हवालदार संजीत रघुनाथ कदम, कोल्हापूरच्या जिल्हा कारागृहाचे शिपाई दिगांबर सदाशिव विभुती या महाराष्ट्रातील चार कारागृह कर्मचाऱ्यांचा समावेश आहे़५६ जणांना जीवनरक्षा पदकराष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी सन २०१४ साठी दिल्या जाणाऱ्या जीवनरक्षा पदक पुरस्कारांसाठीच्या ५६ लोकांच्या नावांना आज रविवार मंजुरी दिली़ यापैकी चौघांना सर्वोत्तम जीवनरक्षा पदक, १७ लोकांना उत्तम जीवनरक्षा पदक आणि ३५ लोकांना जीवन रक्षक पदक दिले जाणार आहे़ २७ लोकांना मरणोत्तर हा पुरस्कार जाहीर झाला आहे़ महाराष्ट्रातील रमेश शशिकांत पवार (मरणोत्तर), गणेश अहिराव (मरणोत्तर) यांना उत्तम जीवनरक्षा पदक जाहीर झाले आहे़ महाराष्ट्राचेच जितेश मधुकर काळे यांना जीवनरक्षा पदक जाहीर झाले आहे़ एखाद्या व्यक्तीचा जीव वाचविण्याचे मानवीय कार्य करणाऱ्यांना या पुरस्काराने गौरविण्यात येते़ (लोकमत न्यूज नेटवर्क)विविध पुरस्कार मिळालेल्या महाराष्ट्रातील पोलीस अधिकाऱ्यांची नावे खालीलप्रमाणेगिरीधर नागो आत्राम (मरणोत्तर), पोलीस नाईकमोहंमद सुवेज मेहबूब हक, पोलीस अधीक्षक यशवंत अशोक काळे, पोलीस उपअधीक्षकप्रकाश व्यंकट वाघमारे, पोलीस उपनिरीक्षकसदाशिव लखमा मडावी, पोलीस नाईकगंगाधर सिडाम, पोलीस नाईकमुरलीधर सखाराम वेलादी, पोलीस कॉन्स्टेबलअतुल श्रावण तावडे, पोलीस उपनिरीक्षकअंकुश शिवाजी माने, पोलीस उपनिरीक्षकविनोद हिचामी, पोलीस नाईकसुनील तुकडू मडावी (मरणोत्तर), पोलीस कॉन्स्टेबलराजेंद्र कुमार तिवारी, सहायक पोलीस निरीक्षकसंदीप म्हस्के, पोलीस उपनिरीक्षकअविनाश गडख, पोलीस उपनिरीक्षकरमेश येडे, हेडकॉन्स्टेबलवामन सहदेव पारधी, पोलीस नाईक -राधेश्याम सीताराम गाते, पोलीस नाईक - उमेश भगवान इंगळे, पोलीस नाईक
देशभरातील ९६७ पोलीस कर्मचा-यांना शौर्यपदक जाहीर
By admin | Published: January 26, 2015 3:30 AM