लडाख: पूर्व लडाखमधील सीमावर्ती भागात चीनची आगळीक सुरूच आहे. २९-३० ऑगस्टच्या रात्री चिनी सैनिकांनी भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र भारतीय जवानांनी त्यांना रोखलं. यावेळी दोन्ही देशांच्या जवानांमध्ये झटापट झाली. याआधी १५ जूनलाही भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये झटापट झाली होती. त्यात भारताच्या २० जवानांनी हौतात्म्य पत्करलं.पूर्व लडाखमधील तणाव ४ महिन्यांनंतरही कायम आहे. १५ जूनला गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या सैन्यात जोरदार झटापट झाली. चिनी सैन्यानं बैठकीत ठरल्याप्रमाणे माघार न घेतल्यानं दोन्ही बाजूंमध्ये वाद झाला. चिनी सैन्यानं हल्ला करताच भारतीय जवानांनीदेखील चोख प्रत्युत्तर दिलं. बिहार रेजिमेंट आणि आयटीबीपीच्या जवानांनी चिनी सैन्यावर जोरदार हल्ला केला. या झटापटीत भारताच्या २० जवानांना वीरमरण आलं. मात्र चीननं यामध्ये मृत्यूमुखी पडलेल्यांचा आकडा जाहीर केला नव्हता. गलवानमध्ये १५ जूनला झालेल्या झटापटीत चीनचे ८० हून सैनिक ठार झाल्याचा दावा केला जात आहे. त्यासाठी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोंचा आधार घेतला जात आहे. शिनजियांग प्रांतात ८० हून अधिक जवानांच्या कबरी बांधण्यात आल्याचं फोटोंमध्ये दिसत आहे. या कबरी गलवानमध्ये मारल्या गेलेल्या सैनिकांच्या असल्याचा दावा तज्ज्ञांनी केला आहे. याआधीही एका सैनिकाच्या कबरीचा फोटो व्हायरल झाला होता. चीन-भारत सीमा संघर्षात शहीद असं या सैनिकाच्या कबरीवर लिहिलं गेलं होतं.भारत-चीन सीमेवर पुन्हा झटापट; चिनी सैन्याच्या घुसखोरीचा डाव भारतीय जवानांनी उधळलापूर्व लडाखमधील पँगाँग तलाव परिसरात चिनी सैनिकांनी २९-३० ऑगस्टच्या मध्यरात्री घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. भारतीय जवानांनी चिनी सैन्याला चोख प्रत्युत्तर दिलं. भारत आणि चीन सैन्यामध्ये झालेल्या बैठकांमध्ये काही गोष्टींबद्दल सहमती झाली होती. त्यांचं उल्लंघन करण्याचा प्रयत्न चीनकडून करण्यात आल्याची माहिती भारतीय सैन्यानं दिली आहे. पँगाँग तलावाच्या दक्षिणी किनाऱ्यावरून चिनी सैन्यानं घुसखोरीचा प्रयत्न केला. त्याला भारतानं विरोध केला. चिनी सैन्याला भारतीय सैन्यानं रोखलं. त्यानंतर भारतानं या भागातील फौजफाटा वाढवला. पँगाँग तलाव परिसरात दोन्ही सैन्यांमध्ये झटापट झाल्यानंतर चुशूलमध्ये ब्रिगेड कमांडर दर्जाच्या अधिकाऱ्यांची बैठक सुरू आहे. गेल्या चार महिन्यांपासून पूर्व लडाखमधील सीमावर्ती भागातील तणाव कमी झालेला नाही. तणाव कमी करण्यासाठी दोन्ही सैन्याच्या अधिकाऱ्यांच्या बैठकांचं सत्र सुरू आहे. मात्र अद्यापही परिस्थितीत बदल झालेला नाही. एप्रिल पूर्वी असलेली परिस्थिती कायम ठेवावी, अशी स्पष्ट भूमिका भारतानं घेतलेली आहे. एका बाजूला लष्करी अधिकाऱ्यांच्या बैठका सुरू असताना दुसऱ्या बाजूला परराष्ट्र मंत्रालयांच्या माध्यमातूनही चर्चा सुरू आहेत. पूर्व लडाखमधून सैन्य माघारी घेण्याबद्दल दोन्ही देशाचं एकमत झालं आहे. मात्र त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही.समुद्रात चीनची दादागिरी रोखणार?, नव्या 6 पाणबुड्या खरेदीची भारताची तयारीगलवान व्हॅलीचा बदला! भारताने दक्षिण चीन समुद्रात युद्धनौका धाडल्या; पाणबुड्याही तयारीतचीन डोकलाम अन् नाथू लामध्ये तयार करतोय मिसाइल साइट्स, सॅटेलाइट फोटोंतून उघड
Galwan Valley Clash: लडाखच्या गलवान खोऱ्यात 'त्या' रात्री ८० चिनी सैनिक ठार?; फोटो व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2020 4:27 PM