BJP Congress LokSabha : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आज मध्य प्रदेशातील सभेतून विरोधकांच्या इंडिया आघाडीला (India Alliance) 'घमंडिया' आघाडी म्हटले. पीएम मोदींच्या या टीकेला काँग्रेस नेते जयराम रमेश (Jairam Ramesh) यांनी गुरुवारी(दि.14) प्रत्युत्तर दिले. जयराम रमेश यांनी उद्योगपती गौतम अदानी यांच्याशी संबंध जोडून NDA युतीवर निशाणा साधला. रमेश यांनी NDA आघाडीला (GA-NDA) 'गंदा' म्हटले.
मध्य प्रदेशातील सभेला संबोधित करताना पीएम मोदींनी इंडिया आघाडीवर निशाणा साधत, 'घमंडीया' आघाडी म्हटले. 'सनातन धर्म पाळणाऱ्या प्रत्येकाने सतर्क राहावे. सनातन धर्माला नष्ट करुन हजारो वर्षे मागे गुलामगीरीत ढकलण्याचा इंडिया आघाडीचा हेतू आहे', अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.
पंतप्रधान मोदींच्या टीकेला प्रत्युत्तर देताना जयराम रमेश म्हणाले की, 'पंतप्रधानांनी पुन्हा तेच केले, ज्यात ते माहिर आहेत, अपमान करणे. त्यांनी इंडिया आघाडीला पुन्हा खमंडीया आघाडी म्हटले. कोण बोलतंय पाहा, सरकारी कार्यक्रमाच्या निमित्ताने विरोधकांचा अपमान करणारी व्यक्ती. त्याच्या पातळीवर जाऊन आम्ही म्हणू शकतो की, ते गौतम अदानी (GA-NDA) युतीचे प्रमुख आहे,' अशी टीका रमेश यांनी केली.
स्टॅलिन यांच्या विधानाने वादद्रमुक पक्षाचे नेते उदयनिधी स्टॅलिन यांच्या 'सनातन धर्मा'वरील वादग्रस्त विधानावरुन वाद सुरू झाला. उदयनिधी यांनी सनातन धर्माची तुलना डेंग्यू, मलेरिया आणि कोरोनाशी केली. यानंतर भाजप नेते सातत्याने इंडिया आघाडीवर टीका रत आहेत. भाजप नेत्यांनी हा मुद्दा उचलून धरला आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हाच मुद्दा पकडून भाजप नेते विरोधकांना धारेवर धरत आहेत.