"...म्हणून मी सोनिया गांधींना मानते", घराणेशाहीवर उमा भारतींचे विधान 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2020 08:46 PM2020-08-24T20:46:42+5:302020-08-24T21:26:34+5:30

"जगभरातील लोकांनी मिळून अमेरिका हा देश बनवला आहे. अमेरिकेने आपला स्वत:चा मूळ वंश नष्ट करून टाकला आहे."

Gandhi-Nehru family's political dominance is over: Uma Bharti | "...म्हणून मी सोनिया गांधींना मानते", घराणेशाहीवर उमा भारतींचे विधान 

"...म्हणून मी सोनिया गांधींना मानते", घराणेशाहीवर उमा भारतींचे विधान 

Next
ठळक मुद्देउमा भारती यांनी अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी देखील भाष्य केले. पक्षाच्या हंगामी अध्यक्षपदी सोनिया गांधी यांनाच कायम ठेवण्याचा निर्णय काँग्रेसच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

भोपाळ : सोनिया गांधी यांनी काँग्रेसचे हंगामी अध्यक्षपद सोडण्याच्या विचारांचे भाजपा नेत्या उमा भारती स्वागत केले आहे. आपला देश घराणेशाहीच्या राजकारणापासून मुक्त व्हावा, असे मला वाटते आणि देशाला घराणेशाहीपासून मुक्त करायचे असेल तर त्याची सुरुवात काँग्रेसपासूनच झाली होती. म्हणून मी सोनिया गांधी यांना भरपूर मानते आणि त्या आदराच्या भावनेनेच मी असे बोलत आहे, असे विधान उमा भारती यांनी केले आहे. 

याचबरोबर, भारतीय लोकांनी अमेरिकेत उपराष्ट्रपतिपदाच्या उमेदवार कमला हॅरिस यांचा अभिमान बाळगण्यापेक्षा ज्या भारतीय महिलांनी भारताच्या राजकारणात आणि जगात आपले स्थान निर्माण करणाऱ्या आणि आपले नाव कमावणाऱ्या महिलांबाबत अभिमान बाळगावा, असेही उमा भारती यांनी सांगितले. कमला हॅरिस या अमेरिकी आहेत, तशाच त्या भारतीय देखील आहेत. त्या मूळ भारतीय वंशाच्या असल्या तरी त्या अमेरिकेत जन्माला आलेल्या महिला आहेत. त्यांच्या संपूर्ण निष्ठा या अमेरिकेशी जोडलेल्या आहेत. भारतीयांना जर अभिमान बाळगायचाच असेल तर अशा लोकांचा बाळगा जे भारतीय आहेत आणि त्यांनी जगात नाव कमावले आहे, असे उमा भारती म्हणाल्या.

जगभरातील लोकांनी मिळून अमेरिका हा देश बनवला आहे. अमेरिकेने आपला स्वत:चा मूळ वंश नष्ट करून टाकला आहे. अमेरिकेचे मूळ लोक रेड इंडियन आहेत. अमेरिकेत आज जे लोक आहेत, ते बाहेरून आलेले लोक आहेत. त्यांच्यापैकीच कमला हॅरिस या एक आहेत, असे उमा भारती यांनी सांगितले. याशिवाय, ज्या भारतीय महिलांनी भारताच्या राजकारणात आणि जगात आपले स्थान निर्माण करणाऱ्या आणि आपले नाव कमावणाऱ्या महिलांबाबत भारतीय लोकांना अभिमान बाळगावा, अशा महिलांमध्ये इंदिरा गांधी आहेत, सुषमा स्वराज आहेत, तसेच आणखी कितीतरी लोक आहेत, कितीतरी महिला आहेत, असेही उमा भारती म्हणाल्या.

याशिवाय, उमा भारती यांनी अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी देखील भाष्य केले. सुशांतसिंह राजपूत आत्महत्या केल्याचे समजल्यानंतर मला अतिशय दु:ख झाले. हे सर्व प्रकरण आता कोर्टात आहे. सीबीआयही जगातीव मान्यताप्राप्त संस्था आहे. आम्ही त्यांच्या तपासकार्यावर परिणाम होईल असे काही बोलता कामा नये, असे उमा भारती यांनी सांगितले. तसेच, रिया चक्रवर्ती कोण आहे, हे मला माहीत नाही. मात्र, ज्या व्यक्तीचा गुन्हा जोपर्यंत सिद्ध झालेला नाही, तो पर्यंत ती व्यक्ती गुन्हेगार आहे, असे मानता कामा नये. अशा व्यक्तीला कोणत्या परिस्थितीला सामोरे जावे लागत असेल, किती दु:ख सहन करावे लागत असेल?. मात्र, नंतर ती व्यक्ती निर्दोष सिद्ध झाल्यानंतर तिने भोगलेल्या दु:खापासून तिला कशी काय मुक्ती मिळणार? म्हणूनच मी म्हणते की हे प्रकरण प्रसारमाध्यमे आणि नेत्यांनी नियंत्रित करण्याचा प्रयत्न करू नये. यावर राजकारण करू नये, असे उमा भारती यांनी म्हटले.

दरम्यान, काही ज्येष्ठ नेत्यांनी पत्र लिहून केलेली काँग्रेस नेतृत्व बदलाची मागणी, सोनिया गांधींनी पद सोडण्याची व्यक्त केलेली इच्छा, राहुल गांधींनी काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारण्यास दिलेला नकार आणि कार्यकारी समितीच्या बैठकीत झालेली खडाखडी अशा गेले दोन दिवस चाललेल्या नाट्यानंतर अखेर आज काँग्रेसच्या अध्यक्षपदाबाबत निर्णय झाला आहे. पक्षाच्या हंगामी अध्यक्षपदी सोनिया गांधी यांनाच कायम ठेवण्याचा निर्णय काँग्रेसच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

आणखी बातम्या...

- स्वातंत्र्यानंतर १९ नेत्यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली; यामध्ये १४ नेहरू-गांधी घराण्याबाहेरचे...  

- WhatsApp कॉलिंगमध्ये नवा बदल, ग्रुप कॉल आला की...

"राहुल गांधींना पंतप्रधान नरेंद्र मोदी घाबरतात, म्हणून त्यांना काँग्रेसचे अध्यक्ष बनवा"    

महेंद्रसिंग धोनीला पाहिलं की येते नवऱ्याची आठवण - सानिया मिर्झा    

बापरे! 'ही' भाजी 1200 रुपयांना विकली जाते, दोन दिवसांत होते खराब    

गाढवीनीच्या दुधाची पहिली डेअरी सुरू होतेय, एक लिटरची किंमत ७००० रुपये, जाणून घ्या फायदे!    

- आता वाहन नोंदणीचे नियम कडक होणार; मोदी सरकारने उचलले 'हे' पाऊल    

- ट्रेनचे तिकिट बुकिंग विनामूल्य! जाणून घ्या, SBI-IRCTC कार्डचे १० शानदार फायदे!!    

Web Title: Gandhi-Nehru family's political dominance is over: Uma Bharti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.