शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
2
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
3
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
4
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
5
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
6
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
7
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
8
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
9
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
10
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
11
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
12
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
13
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
14
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
15
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
16
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
17
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
18
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
19
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके
20
आयफोनवेडा मुंबईकर; पत्नी-मुलांसाठी खरेदी केले 5 iPhone 16, व्हिडिओ व्हायरल...

नोटांवरूनही गांधी हटविले जातील

By admin | Published: January 15, 2017 4:52 AM

खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या कॅलेंडर व डायरीवरील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या छायाचित्राचा वाद सुरू असतानाच, आता हळूहळू नोटेवरूनही महात्मा गांधींचे छायाचित्र

अंबाला : खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या कॅलेंडर व डायरीवरील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या छायाचित्राचा वाद सुरू असतानाच, आता हळूहळू नोटेवरूनही महात्मा गांधींचे छायाचित्र हटवण्यात येईल, असे वक्तव्य भाजपाचे नेते आणि हरयाणाचे आरोग्यमंत्री अनिल विज यांनी केले. खादीसाठी महात्मा गांधी यांच्यापेक्षा मोदी हे मोठा ब्रँड आहेत, असेही ते म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यामुळे नव्याच वादाला तोंड फुटले आहे.मोदी आणि खादीचे नाते घट्ट आहे. त्यांचे नाव जोडले गेल्यापासून, खादीच्या विक्रीमध्ये १४ टक्के वाढ झाली आहे. खादी ही गांधींची मालकी नाही. गांधींमुळे खादी उत्पादनांमध्ये घसरणच झाली, असे ते उद्गारले. विज नंतर नोटांवरील महात्मा गांधी यांच्या छायाचित्रावरही घसरले. ते म्हणाले की, जेव्हापासून गांधीजी नोटांवर दिसू लागले, तेव्हापासून भारतीय चलनाच्या घसरणीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे हळूहळू नोटांवरूनही महात्मा गांधी यांचे छायाचित्र काढण्यात येईल. (वृत्तसंस्था)हिटलर, मुसोलिनीही ब्रँड होते - राहुलगांधीजींपेक्षा मोदी हे मोठा ब्रँड आहेत, या अनिल विज यांच्या विधानाचा समाचार घेताना काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी म्हणाले की, तसे तर मुसोलिनी आणि हिटलर हे हुकूमशहाही लोकप्रिय ब्रँड होते. पण त्यामुळे त्यांना कोणी मोठे म्हणत नाही.बाष्कळ वक्तव्यअनिल विज यांचे हे वक्तव्य बाष्कळ आहे, अशी प्रतिक्रिया महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांनी दिली. ते म्हणाले की, इतर नेते मनात एक ठेवतात आणि प्रत्यक्षात वेगळे बोलतात. त्या मानाने अनिल विज यांना प्रामाणिकच म्हणायला हवे. अर्थात नोटांवरून महात्मा गांधी यांचे छायाचित्र काढूनच टाका, किमान त्यामुळे गांधीजींची होणारी बदनामी तरी थांबेल, नोटांचा चुकीच्या कामासाठी राजकारणी वापर करतात, त्यातून काळे धन तयार करतात. अशा ठिकाणी गांधी यांचे नसणेच योग्य ठरेल.ते भाजपाचे मत नव्हे विज यांनी केलेली विधाने ही त्यांची वैयक्तिक मते असून, ती भाजपाला मान्य नाहीत, असे पक्षाचे प्रवक्ते श्रीकांत शर्मा यांनी जाहीर केले. ते म्हणाले की, भाजपासाठी गांधी हे देशाचे आयकॉन आहेत व आम्ही गांधीजींचा आणि त्यांच्या तत्त्वज्ञानाचा आदरच करत आलो आहोत.नालायक मुलेबिहारचे माजी मुख्यमंत्री लालुप्रसाद यादव यांनी अनिल विज यांच्या विधानावर जोरदार टीका केली आहे. ही देशाची नालायक मुले आहेत, अशी प्रतिक्रिया यादव यांनी व्यक्त केली.