भोसले आखाड्यात अखेर गटारीचे काम सुरू गणेश भोसले यांचे प्रयत्न : मूलभूत सुविधांची कामे
By admin | Published: October 30, 2016 10:47 PM
अहमदनगर : भोसले आखाडा परिसरातील महापालिका कार्यालय ते सीना नदीपात्रापर्यंत मोठ्या बंद पाईप गटारीचे काम अखेर सुरू झाले आहे. या कामासाठी सात ते आठ वर्षांपासून प्रयत्न करीत होतो, असे नगरसेवक गणेश भोसले यांनी सांगितले.
अहमदनगर : भोसले आखाडा परिसरातील महापालिका कार्यालय ते सीना नदीपात्रापर्यंत मोठ्या बंद पाईप गटारीचे काम अखेर सुरू झाले आहे. या कामासाठी सात ते आठ वर्षांपासून प्रयत्न करीत होतो, असे नगरसेवक गणेश भोसले यांनी सांगितले.यावेळी भोसले म्हणाले,गटारीचे काम पूर्ण झाल्यानंतर त्यावर पेव्हींग ब्लॉक बसवून सुशोभिकरण करण्यात येईल. रस्त्याच्या कडेला पथदिवे बसविण्यात येतील. तसेच बाकड्यांची सोय केली जाणार आहे.यामुळे नागरिकांना सायंकाळी फेरफटका मारण्याची संधी मिळेल. महापालिकेच्या मूलभूत सुविधा योजनेमधून गटारीची कामे केली जाणार आहेत. त्यासाठी ६० लाख रुपये एवढा खर्च येणार आहे. या गटारीच्या कामासाठी बाराशे एम.एम. व्यासाचे सिमेंटचे पाईप वापरले जात आहेत. हे काम चांगल्या दर्जाचे होण्यासाठी लक्ष राहील. काम मंजूर झाल्यानंतरही अनेक अडथळ्यांची शर्यत पार पाडावी लागली. गटारीचे पाईप सीनानदीपर्यंत सोडण्यात अखेर यश आले.-------फोटो- भोसले आखाडा ते सीना नदी या मार्गावर मोठ्या बंद पाईप गटारीचे काम सुरू करण्यात आले. या कामाची पाहणी करताना नगरसेवक गणेश भोसले व परिसरातील नागरिक.