ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. 6 - ऋषीकेश येथे गंगा नदीच्या किना-याजवळ शुक्रवारी कचरा उचलणा-यांना रद्द झालेल्या चलनातील 9.80 लाख रुपये सापडले. उत्तम थारु गंगा नदीच्या किना-यावर कचरा गोळा करत असताना झुडूपामध्ये 500 रुपयांच्या विखुरलेल्या नोटांवर त्याचे लक्ष गेले.
उत्तमने त्या सर्व नोटा गोळा करुन एका पिशवित भरल्या व ती पिशवी पोलिसांकडे सुपूर्द केली अशी माहिती पोलिसांनी दिली. सापडलेल्या जुन्या नोटांचे एकूण मुल्य 9.80 लाख रुपये आहे. पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.