शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
2
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
3
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
4
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
5
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
6
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
7
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
8
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
9
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
10
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
11
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
13
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
14
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
15
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
16
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
17
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
18
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
19
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव

मानवाच्या दर्जानंतर गंगेला मिळाली कोर्टाची नोटीस

By admin | Published: April 30, 2017 12:49 AM

‘गंगा ही एक सजीव वस्तू आहे’, असे महिनाभरापूर्वी जाहीर करणाऱ्या उत्तराखंड उच्च न्यायालयाने आता एका जनहित याचिकेत गंगा नदीलाही नोटीस काढून तिच्याकडून उत्तर

डेहराडून : ‘गंगा ही एक सजीव वस्तू आहे’, असे महिनाभरापूर्वी जाहीर करणाऱ्या उत्तराखंड उच्च न्यायालयाने आता एका जनहित याचिकेत गंगा नदीलाही नोटीस काढून तिच्याकडून उत्तर मागविले आहे. राज्य सरकारने ऋषिकेशपाशी गंगेच्या पात्रात कचरा डेपो मंजूर केला आहे. त्याविरुद्ध खडक मार गावाच्या सरपंचांनी जनहित याचिका केली आहे व त्या याचिकेत इतरांसोबत गंगा नदीलाही प्रतिवादी केले आहे. या याचिकेवर न्यायालयाने इतरांसोबत गंगा नदीलाही नोटीस काढली आहे. ऋषिकेश येथील रहिवासी स्वरूपसिंह पुंडीर यांच्या याचिकेत नियमांचे उल्लंघन करून खादरी खगड गावाजवळ कचरा डेपो उभारण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. ग्रामपंचायतीने ग्रामस्थांना विश्वासात न घेताच ही जमीन नगरपालिकेला दिली, असेही त्यांनी या याचिकेत म्हटले आहे. या याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती व्ही. के. बिष्ट आणि न्यायमूर्ती आलोक सिंह यांच्या खंडपीठाने केंद्र सरकार, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ, राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ, नगरपालिका ऋषिकेशशिवाय गंगेलाही नोटीस पाठविली. ज्यांना नोटीस पाठविण्यात आली त्यांनी आपापले म्हणणे मांडण्याचे आदेश देत उच्च न्यायालयाने या प्रकरणाची पुढील सुनावणी ८ मे रोजी ठेवली आहे.विशेष म्हणजे उत्तराखंड उच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी गंगेला मानवाचा दर्जा देत जिवंत व्यक्तीप्रमाणे सर्व कायदेशीर अधिकार दिले होते.