उत्साहपूर्ण वातावरणात> हजारो भाविकांनी गोदावरीत केले पवित्र स्नान>निफाड> सोमवार दि। 22 रोजी चांदवड तालुक्यातील श्री क्षेत्र देवरगांव येथील वैकुंठवासी योगिराज महाराजांच्या समाधीस्थळापासुन ते निफाड तालुक्यातील कोठुरे येथील गोदावरी नदीपर्यन्त भाविकांनी अत्यंत उत्साह आणि भिक्तपूर्ण वातावरणात पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करून श्रावणी सोमवारच्या निमित्ताने गंगापूजन करून स्नान केले> देवरगांव येथील गुरु वर्य सुजित महाराज यांच्या प्रेरणने बनारस व इलाहाबाद येथुन आणलेले गंगा यमुना सरस्वती नद्यांचे पाणी घेऊन या दिंडीला प्रारंभ करण्यात आला> टाळ म्रुदुंगांच्या जयघोषात निघालेली हि दिंडी एक ते दीड किमी लांब होती देवरगांव येथुन निघालेली हि दिंडी खडकमाळेगांव, खानगांव मुंजाबा फाटा, वनसगांव, उगांव, शिवडी ,निफाड ,जळगांव फाटा ,कोठुरे असा तीस किलोमीटरचा प्रवास करत कोठुरे येथे गोदावरी नदीच्या पात्राजवळील बाणेश्वेराचे दर्शन घेत गंगा गोदावरी मिलन पूजन उत्सव साजरा केला दिंडी मार्गावरील गावागावांत स्वागताचे फलक व कमानी उभारण्यात आल्या होत्या रांगोळ्यांद्वारे गावातील रस्ते सुशोभित केललेे होते भाविकांच्या सेवेसाठी दिंडीमार्गावर ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची , अन्नादानाची सोयदेखील स्वयंसेवी मंडळांनी केली होती> सजवलेल्या चांदीच्या रथात योगीराज हरेकृष्ण बाबांची प्रतिमा व पंचधातूची मूर्ती होती कोठूरे येथे गोदावरी किनारी बाणे श्वराचे दर्शन घेतल्यानंतर बाबांच्या मूर्तीला प्रथम जलाभिषेक करून त्यानंतर दिंडीत सहभागी सर्व हजारो भाविकांनी गोदावरीच्या पात्रात स्नान केले देवरगाव, वनसगाव,उगाव,शिवडी आदी ठिकाणाहून भाविक या अभूतपूर्व सोहळ्यात सहभागी झाले होते. (फोटो कॅप्श्न स्वतंत्र सोडले आहे.)
देवरगांव ते कोठुरे पायी दिंडीद्वारे गंगा गोदावरी मिलन सोहळा
By admin | Published: August 22, 2016 11:33 PM