शहरं
Join us  
Trending Stories
1
बाळासाहेब थोरातांच्या हाती राज्याचे अधिकार द्यायला हवे; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
2
इस्रायलचा बेरूतमध्ये मोठा हवाई हल्ला, अनेक इमारतींचे नुकसान, सात मुलांसह २३ जणांचा मृत्यू
3
मुंबईत मोदींच्या सभेसाठी वाहतूक मार्गात बदल; निवडणुकीसाठी काही रस्त्यांवर सहा दिवस नो पार्किंग!
4
भाजपाचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन
5
...तर त्यांच्या कानाखाली फटाके वाजवा, भाषण करताना राज ठाकरे संतापले, कारण काय?
6
"सरकार पाडण्यासाठी आमदारांना ५० कोटींची ऑफर...", मुख्यमंत्र्यांचा भाजपवर आरोप
7
आजचे राशीभविष्य - १४ नोव्हेंबर २०२४, सगळ्या कामात यश मिळाल्याने खूप आनंदी आणि प्रसन्न व्हाल
8
भाजपकडून माझा बुथ, सर्वात मजबूत अभियान, नरेंद्र मोदी साधणार महाराष्ट्रातील १ लाख बुथ प्रमुखांशी संवाद
9
विशेष लेख: न्या. चंद्रचूड मानवी हक्क आयोगाचे नवे अध्यक्ष?
10
कोण आहेत कॅनडातील सर्वात श्रीमंत भारतीय, ज्यांना जगही म्हणतं कॅनडियन वॉरन बफे; पद्मश्रीनंही झालाय सन्मान
11
आजचा अग्रलेख: 'बुलडोझर'ला ब्रेक...
12
धक्कादायक! जळगावात गरोदर महिलेला घेऊन जाणाऱ्या ॲम्बुलन्समध्ये ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट; १५० फूट उंच उडाल्या चिंधड्या
13
शिवाजी पार्कवर आवाज कुणाचा?; १७ नोव्हेंबरला सभेसाठी मनसेला मंजुरी मिळण्याची शक्यता
14
मुंबईत प्लास्टिकच्या डब्यात तुकडे करून टाकलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले; प्रेमसंबंधाच्या विरोधातून हत्या!
15
नागपुरात कार्यकर्तेच बनले फडणवीसांच्या प्रचार मोहिमेचे सारथी
16
मार्कोची फास्टर फिफ्टी; पण शेवटी सूर्याची सेना जिंकली! आता फक्त टीम इंडियालाच मालिका विजयाची संधी
17
"आत टाका म्हणजे पक्षात टाका हे लोकांना कळलंच नाही"; ईडी कारवायांवरुन राज ठाकरेंची मिश्किल टिप्पणी
18
IND vs SA : विक्रमी धावसंख्येसह टीम इंडियाच्या नावे झाला सर्वाधिक शतकांचा खास रेकॉर्ड
19
केंद्र सरकारनं मणिपूरमध्ये रातोरात पाठले 2000 CAPF जवान, आता कशी आहे जिरीबाम मधील स्थिती?
20
शेतकऱ्यांना मोठा दिलासा! हंगामाच्या सुरुवातीलाच धानाला विक्रमी दर, केंद्र सरकारने 'ड्युटी' रद्द केल्याचा परिणाम

गँगस्टर मुस्तफा डोसाने कोर्टाच्या आवारातच घेतल्या मॉडेल्सच्या 'ऑडिशन्स'

By admin | Published: May 28, 2015 5:15 PM

कुख्यात गँगस्टर दाऊद इब्राहिमचा निकटचा साथीदार आणि १९९३ च्या मुंबई बाँबस्फोटातील आरोपी मुस्तफा डोसाने चक्क कोर्टाच्या आवारातच काही मॉडेल्सच्या 'ऑडिशन्स' घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २८ - कुख्यात गँगस्टर दाऊद इब्राहिमचा निकटचा साथीदार आणि १९९३ च्या मुंबई बाँबस्फोटातील आरोपी मुस्तफा डोसाने चक्क कोर्टाच्या आवारातच काही मॉडेल्सच्या 'ऑडिशन्स' घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दुबईस्थित एका ज्वेलरी शॉपसाठी मॉडेलिंग करण्यासाठी मुस्तफाने या महिन्याच्या सुरूवातीस सत्र न्यायालयाच्या आवारात सुमारे १२ मॉडेल्सची ऑडिशन घेतली. मुस्तफासारखा कुख्यात गुंड कोर्टाच्या आवारातच खुलेआम ऑडिशन घेत असेल तर तो तितक्याच सहज निसटूही शकतो त्यामुळे हा प्रकार अतिशय धोकादायक असल्याचे मत व्यक्त होत आहे. तसेच पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. 
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुस्तफा डोसाने ऑडिशननंतर तीन जणींची अंतिम निवड केली आणि त्यांना अॅडव्हान्स म्हणून काही रक्कम दिली. मात्र निवड झालेल्यांपैकी एका मॉडेलला तोतया पोलिसांनी दादर परिसरात रोखून तिच्याकडील रोख रक्कम व तिचा मोबाईल जप्त केला. तसेच या कारवाईनंतर त्या पोलिसांपैकी एकाने या मॉडेललाचौकशीसाठी क्राईम ब्राँचच्या कार्यालयात येण्यास सांगितले. काही दिवसांनी ती मॉडेल अँटॉप हिल येथील क्राईम ब्रांचच्या कार्यालयात पोचली असता आपल्याकडून रोख रक्कम घेणा-यांपैकी एकही व्यक्ती क्राईम ब्रांचसाठी काम करणारी नसून ते तोतया पोलिस असल्याचे तिच्या लक्षात आले. आपली फसवणूक झाल्याचे समजल्यानंतर तिने माहिम पोलिस स्थानकात गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी ताबडतोब सूत्रे  फिरवत त्या तोतया अधिका-यांचा कसून शोध घेण्यास सुरूवात केली आणि तीन जणांना अटक केली.  
दरम्यान याप्रकरणी पोलिस पुढे काय कारवाई करतात,  मुस्तफाला ऑडिशन घेण्याची परवानगी कशी मिळाली, या सर्व प्रकरणाची चौकशी तरी होते का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.