शहरं
Join us  
Trending Stories
1
"इतिहास माझ्या कारकीर्दीचं मूल्यमापन कसं करेल?"; CJI चंद्रचूड नक्की काय म्हणाले?
2
BREAKING: घाटकोपरच्या नारायण नगरमध्ये भीषण आग, नागरिकांची धावपळ; दाट लोकवस्तीमुळे परिसरात घबराट
3
"पवार साहेब म्हणाले, सगळीकडे आयात उमेदवार नाही", तिकीट वाटपाबद्दल रोहित पवारांचं विधान
4
दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान सील, PWD ने लावले कुलूप; कारण काय? पाहा...
5
शरद पवारांची चालाख खेळी: हजारो इच्छुकांच्या मुलाखती, पण बारामतीतील पत्ता राखून ठेवला!
6
अपक्ष उमेदवार सावित्री जिंदाल यांचा भाजप सरकारला पाठिंबा; मंत्रीपदाबाबत नवीन जिंदाल म्हणाले...
7
सुप्रिया सुळे यांच्या कारमध्ये नेत्याने फाईलने लपवला चेहरा; अजित पवारांनी रोखठोक शब्दांत दिली प्रतिक्रिया 
8
"काँग्रेस पक्ष इंडिया आघाडीतील इतर पक्षांसाठी ओझं झालाय"; ज्योतिरादित्य शिंदेंचा खोचक टोला
9
INDW vs SLW : स्मृती मानधना अन् हरमनप्रीतपेक्षा जेमिमा भारी; इथं पाहा खास रेकॉर्ड
10
प्राजक्ताचा 'फुलवंती' प्रवास...!, सिनेमाबद्दल अभिनेत्री आणि गश्मीर महाजनी म्हणाला....
11
मनोज जरांगेंबद्दल आक्षेपार्ह पोस्ट, संभाजी ब्रिगेडकडून शाईफेक; डॉक्टरने काय म्हटलं?
12
PAK vs ENG Test : तब्बल ५५६ धावा करुनही पाकिस्तानची 'कसोटी', इंग्लंडचे जोरदार प्रत्युत्तर; रुट-ब्रूकचे शतक
13
हरयाणातील पराभवानंतर उत्तर प्रदेशात सपाचा काँग्रेसला धक्का, केली मोठी घोषणा!
14
पाकिस्तानच्या सीमेलगत विणणार २२८० किमी लांब रस्त्यांचं जाळं, मोदी सरकारचा मोठा निर्णय
15
पहिल्यांदाच जम्मू काश्मीरची निवडणूक लढणाऱ्या ठाकरेंच्या उमेदवारांना किती मते मिळाली?
16
"मोदी-शाहांच्या आदेशाने महाराष्ट्रातील ७.५ लाख कोटी आणि ५ लाख रोजगार गुजरातने पळवले’’, काँग्रेसचा गंभीर आरोप  
17
सपा, शिवसेना अन् आपचा काँग्रेसला घरचा आहेर; हरयाणातील पराभवानंतर 'INDIA' मध्ये मतभेद
18
अदानी समूहानंतर 'ही' कंपनी हिंडेनबर्गच्या रडारवर; Roblox वर आरोप काय?
19
'गधराज' वरून सलमान खान, Bigg Boss चे मेकर्स अडचणीत? नक्की काय घडलं वाचा...
20
'धनगर समाजाचा मार्ग मोकळा होतो मग आमचा का होत नाही?'; मनोज जरांगे पाटलांचा राज्य सरकारला सवाल

५०० रुपयांत गॅस सिलिंडर! काँग्रेसने तेलंगणातील जनतेला दिल्या ६ ‘गॅरंटी’

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2023 9:39 AM

निवडणुकीसाठी तयारीला लागा, असे आवाहन बैठकीत रविवारी करण्यात आले.

हैदराबाद : आगामी  काँग्रेसने तेलंगणा विधानसभा निवडणुकीला काही महिने शिल्लक असताना रविवारी राज्यातील जनतेला सहा ‘गॅरंटी’ दिल्या. यात महिलांना प्रत्येक महिन्याला दीड हचार रुपये, ५०० रुपयांत गॅस सिलिंडर आणि शेतकर्यांना प्रत्येक वर्षाला १५ हजार रुपये देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी या सहा 'गॅरंटी'चा उल्लेख केला आणि पक्षाचे सरकार बनताच त्या पूर्ण केल्या जातील, असे सांगितले. हैद्राबादच्या  तुक्कुगुडाजवळील काँग्रेसच्या जाहीर सभेत राहुल गांधींनी या सहा 'गॅरंटी' जनतेला दिल्या. दरम्यान, निवडणुकीसाठी तयारीला लागा, असे आवाहन बैठकीत रविवारी करण्यात आले. तर, पक्षनेत्यांनी शिस्त पाळावी आणि एकजूट ठेवावी, असे निर्देश अध्यक्ष खरगे यांनी दिले. 

तुम्ही त्यांच्या जाळ्यात अडकू नका : राहुल गांधी  कार्यकारिणीच्या बैठकीत वैचारिक स्पष्टतेवर भर देताना काँग्रेसचे नेते राहुल गांधी म्हणाले की, खऱ्या मुद्द्यांवरून लक्ष विचलित करण्याच्या भाजपच्या जाळ्यात नेत्यांनी अडकू नये. तर, जनतेशी निगडित मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. तुम्ही कर्नाटकातील जनतेला विचारा. आम्ही जी आश्वासने देतो ती सर्व पूर्ण करतो, असे ते नंतर सभेत म्हणाले.

परिवर्तनाची चिन्हेखरगे म्हणाले की, देशात परिवर्तनाची चिन्हे दिसत आहेत. कर्नाटक आणि हिमाचल प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या निकालावरून ते दिसून येत आहे. ‘एक राष्ट्र, एक निवडणूक’ या मुद्द्यावरून खरगे यांनी सरकारवर निशाणा साधला. 

या आहेत त्या ६ गॅरंटी महालक्ष्मीमहिलांना प्रति महिना २,५०० रूपये५०० रुपयांमध्ये गॅस सिलिंडरमोफत बस प्रवास१५ हजार शेतकरी आणि भाडेकरूंसाठी १२ हजार मजुरांसाठी ५०० रुपये प्रति क्विंटल भातासाठीगृह ज्योती हमी२०० युनिट सर्व घरांसाठी मोफत वीजइंदिराम्मा इंदलू ५ लाख रुपये स्वतःचे घर नसलेल्या लोकांसाठी२५० चौरस यार्डचा भूखंड तेलंगणा चळवळीतील सर्व सैनिकांसाठी५ लाख रुपये किमतीचे विद्यार्थ्यांसाठी  विद्या भरोसा कार्ड.प्रत्येक मंडळात तेलंगणा आंतरराष्ट्रीय शाळा.

खरगे म्हणाले...आरामात बसण्याची ही वेळ नाही. दिवस-रात्र मेहनत करा.आपल्या सर्वांच्या आयुष्यात चढ-उतार असतात. पण, आपण नेहमी शिस्तबद्ध राहायला हवे. देशातील जनतेला बदल हवा आहे. अधिवेशनात महिला आरक्षण विधेयक मंजूर करण्यात यावे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस