राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुका सुरू झाल्या आहेत. सर्वपक्षीयांनी निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. भाजपने आज आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. यासाठी पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा जयपूरमध्ये आले आहेत. भाजपने आपल्या जाहीरनाम्याला संकल्प पत्र म्हटले आहे, भाजपने राजस्थानमध्ये जाहीरनाम्याला ‘आपनो आगे राजस्थान संकल्प पत्र’ असे नाव देण्यात आले आहे. काँग्रेस पक्षाच्या गेल्या पाच वर्षांच्या कार्यकाळावर त्यांनी टीका केली. दरम्यान, केंद्रीय योजनांचा उल्लेख करताना अध्यक्ष नड्डा म्हणाले की, भाजपने योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याचे काम केले. त्यांनी केंद्र सरकारने दिलेल्या नियुक्तीपत्रांचा उल्लेख करून सात महिन्यांत सहा लाख तरुणांना सरकारी नोकऱ्या दिल्याचे सांगितले.
प्रचाराचा काळ! आता तेलंगणात बीआरएस आमदाराच्या घरी आयकर विभाग पोहोचला; छापेमारी सुरू
यावेळी बोलताना जेपी नड्डा म्हणाले की, आम्हाला राजस्थानमध्ये डबल इंजिनचे सरकार हवे आहे. यावेळी त्यांनी अशोक गेहलोत सरकारवर घोटाळ्याचा आरोप केला. भाजप सरकारच्या काळात जनतेला फायदा होणार असल्याचे ते म्हणाले. भाजपच्या जाहीरनाम्याचे तीन स्तंभ आहेत. यामध्ये सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास विकासाचा मंत्र आहे दुसरे, गावातील गरीब, वंचित, शोषित, अनुसूचित जाती, जमाती, महिलांचे सक्षमीकरण करणे, आणि तिसर्यामध्ये पायाभूत सुविधांमध्ये भर घालणे समाविष्ट आहे, असंही नड्डा म्हणाले.
जाहीरनाम्यात काय आहे?
'राज्यात ज्या शेतकऱ्यांच्या जमिनींचा लिलाव झाला त्यांना योग्य मोबदला देण्यासाठी नुकसानभरपाईचे धोरण आणणार आहे. जिल्ह्यातील प्रत्येक पोलिस ठाण्यात महिला पोलिस ठाणे आणि महिला डेस्क आणि सर्व प्रमुख शहरांमध्ये रोमियोविरोधी पथके तयार करण्यात येणार आहेत. लाडो इन्सेंटिव्ह योजना सुरू केली जाईल ज्या अंतर्गत मुलीच्या जन्मावर २ लाख रुपयांची बचत मोडद्वारे आर्थिक मदत दिली जाईल. मुख्यमंत्री मोफत स्कूटी योजनेंतर्गत बारावी उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थिनींना स्कूटी देण्यात येणार आहे.लखपती दीदी योजनेअंतर्गत ६ लाखांहून अधिक ग्रामीण महिलांना कौशल्य प्रशिक्षण दिले जाणार आहे.
पीएम उज्ज्वला योजनेंतर्गत सर्व गरीब कुटुंबातील महिलांना ४५० रुपयांमध्ये सिलिंडर दिले जाणार आहेत. आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील विद्यार्थ्यांना गणवेश इत्यादीसाठी १२०० रुपये वार्षिक मदत दिली जाईल. आमचे सरकार आल्यास पेपरफुटी, खत, मिड डे मील, खाणकाम, पीएम हाऊसिंग, जल जीवन आदी घोटाळ्यांची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन केली जाईल, असंही जेपी नड्डा म्हणाले. पर्यटनाच्या दृष्टिकोनातून पर्यटनाला चालना देण्यासाठी आम्ही पर्यटन कौशल्य अभ्यासक्रम तयार करून पाच लाख तरुणांना प्रशिक्षित करणार आहोत आणि त्यासोबतच रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणार आहोत, असंही या घोषणापत्रात म्हटले आहे.