गुजरात - गांधीनगरमधील कलोलमध्ये ओएनजीसी गॅस पाइपलाइन स्फोटात 2 घरं कोसळली. त्यात दोघांचा मृत्यू तर दोनजण जखमी जखमी झाले आहेत. "मुख्यतः असे दिसते आहे की, गॅस गळतीमुळे पाईपलाईन फुटल्याने दोन घरे जमीनदोस्त झाली आहेत, तज्ञ याची पडताळणी करीत आहेत," असे गांधीनगर रेंजचे आयजीपी अभय चुडासमा यांनी सांगितले.
सुरुवातीला ही ओएनजीसी पाइपलाइन असल्याचे म्हटले जात होते, तथापि कंपनीने निवेदनात स्पष्ट केले की, ही पाइपलाइन ओएनजीसीची नाही. ओएनजीसीने एका निवेदन पत्रकात म्हटले आहे की, “ओएनजीसीच्या कलोल शेताजवळील निवासी भागात गॅस पाइपलाइनमधून आज सकाळी 9.30 वाजेच्या सुमारास गॅस गळती झाली. ओएनजीसीने याबाबत माहिती दिलीकी ही पाइपलाइन ओएनजीसीशी संबंधित नाही. एक जबाबदार कॉर्पोरेट नागरिक म्हणून ओएनजीसी अहमदाबाद अॅसेट हे अग्निशामक सुरक्षा यंत्रणेसाठी राज्य सरकारच्या यंत्रणेच्या संपर्कात आहे. ओएनजीसीच्या अग्निशमन पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत आणि ओएनजीसी, क्राइसिस मॅनेजमेन्ट टीमला कोणत्याही प्रकारच्या इमर्जन्सीसाठी सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.