नवी दिल्ली – देशात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचे आंतरराष्ट्रीय पडसाद उमटल्यानंतर भारतीय कलाकार आता ट्विटरच्या माध्यमातून यावर प्रतिक्रिया देत आहेत. अमेरिकेतील पॉप स्टार रिहानासह अनेक परदेशी कलाकारांनी शेतकरी आंदोलनावर भाष्य केलं, याला प्रत्युत्तर म्हणून बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार, अजय देवगन, सुनील शेट्टी, लता मंगेशकर, करण जोहर तसेच माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकर यांनी ट्विट केलं, हा भारताचा अंतर्गत विषय असून आम्ही तो सोडवण्यास सक्षम आहोत असं कलाकारांचा म्हणणं होतं, एकप्रकारे केंद्र सरकारच्या भूमिकेचं समर्थन करणारे ट्विट कलाकारांनी केले होते.
विधानसभा अध्यक्षपदावरून महाविकास आघाडीत तणाव; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाराज?
त्यावरून या सेलिब्रिटींविरोधत अनेकांनी सोशल मीडियात संताप व्यक्त केला. सेलिब्रिटीजच्या या ट्विटवर गौहर खान हिनेही ट्विट केले, ज्यात तिने #BlackLivesMatter हा भारताचा मुद्दा नव्हता, तरीही भारतीय कलाकारांनी त्याच्या समर्थनार्थ ट्विट केले होते याचा उल्लेख केला. गौहर खानने ट्विटमध्ये लिहिलंय की, #BlackLivesMatter हा भारतीय मुद्दा नव्हता परंतु प्रत्येक भारतीय कलाकार त्याच्या समर्थनार्थ ट्विट करत होते, कारण साहजिकच प्रत्येकाचे आयुष्य महत्त्वाचे आहे. पण भारतीय शेतकरी? त्यांच्या आयुष्याचं काही महत्त्व नाही का? असा सवाल तिने केला आहे.
तसेच "गौहर खानचे हे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, त्याचबरोबर लोक यावर मोठ्या प्रमाणात कमेंट्स देखील देत आहेत. गौहर खानखेरीज नकुल मेहता, स्वरा भास्कर, वरुण ग्रोव्हर आणि इरफान पठाण यांनीही यासंदर्भात ट्विट देखील केले आहे. #BlackLivesMatter हा अमेरिकेशी संबंधित मुद्दा होता, जेव्हा ह्यूस्टन येथे राहणाऱ्या जॉर्ज फ्लॉयड, ज्यांचे वय ४६ वर्ष होते, त्यांना एका पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांचा गळा दाबल्यामुळे मृत्यू झाला होता.
‘सत्तेचा फॉर्म्युला तयार, फक्त बटण दाबायची देरी' बंद दाराआड नेमकी चर्चा काय घडली?
अमेरिकेतील या प्रकरणाची आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चा झाली, अनेक ठिकाणी विरोध प्रदर्शने झाली, आंदोलन, धरणं करून निषेध करण्यात आला. फक्त अमेरिकेतच नाही तर संपूर्ण जगात #BlackLivesMatter हा हॅशटॅग वापरून ट्विट करण्यात आलं, अमेरिकेत झालेल्या या दुर्दैवी घटनेचा अनेकांनी विरोध केला. सर्वसामान्य लोकांसह अनेक सेलिब्रिटीजने या मुद्द्यावरून अमेरिकन प्रशासनावर टीका केली होती.