निलंगा : महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त फुले प्रतिष्ठानच्या वतीने शनिवारी सहा शिक्षकांना शिक्षकरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले. अध्यक्षस्थानी गोविंद पेठकर होते. यावेळी फुले प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष ॲड. गोविंदराव बादाडे, डॉ. यादव, प्रा. दयानंद चोपणे, वैजनाथ चोपणे, प्रकाश दापके यांची उपस्थिती होती. याप्रसंगी मुख्याध्यापक मोहन नटवे, एम.एम. जाधव, विजय पेठकर, सहशिक्षक नारायण नळेगावे, शाकेर हाशमी, मीनाताई चोपणे यांचा गौरव करण्यात आला. तसेच समियोद्दीन काद्री यांना क्रीडारत्न पुरस्कार देण्यात आला. प्रास्ताविक प्रा. दयानंद चोपणे यांनी केले. सूत्रसंचालन दत्ता दापके यांनी केले. आभार विठ्ठल चांभारगे यांनी मानले. यशस्वितेसाठी संजय चोपणे, नीळकंठ पेठकर, गंगाधर वांजरवाडे, शरद पेठकर, माधव पेठकर, संजय पेठकर, राहुल पेठकर, बालाजी वांजरवाडे, बालाजी पुजारी, सुनील वांजरवाडे आदींनी परिश्रम घेतले.
फुले प्रतिष्ठानच्या वतीने शिक्षकरत्न पुरस्काराने गौरव
By admin | Published: November 29, 2015 11:57 PM