शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचा बळी का..? , वरळीत मुलाला फायदा व्हावा यासाठी उद्धव ठाकरेंचा रईस शेख यांना पाठिंबा"
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : आर्वीचे आमदार दादाराव केचे यांची नाराजी दूर; ४ नोव्हेंबरला नामांकन अर्ज मागे घेणार
3
"गेल्या अडीच वर्षांपूर्वी CM शिंदे यांनाही अशीच धमकी आली होती, पण...!"; उदय सामंत यांचा खळबळजनक आरोप
4
निज्जर प्रकरणात गृहमंत्री अमित शहांचे नाव घेतल्याने भारताचा संताप; कॅनडाला फटकारले
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राज्यात महायुती की महाविकास आघाडी? सर्व्हेतील धक्कादायक आकडे आले समोर
6
"...तर जरांगेंचा बोलवता धनी कोण? यावर शिक्कामोर्तब होईल"; भाजप नेते प्रविण दरेकर स्पष्टच बोलले 
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: 'शरद पवारांचे नाव घेतलं की अंगावर काटा येतो, त्यांच्यावर बोलणं..."; नरहरी झिरवाळांनी स्पष्टच सांगितलं
8
राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या १० प्रचार सभा; ८ नोव्हेंबरला पहिली सभा
9
'कोणीही मतदानापासून वंचित राहू नये, साखर कारखाने २१ नोव्हेंबरनंतर सुरु करा'; सदाभाऊ खोतांनी केली मागणी
10
हिट अँड रन प्रकरणात BMW असलेल्या भाजपा नेत्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात, तपास सुरू
11
लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने पप्पू यादवांना धमकावणाऱ्याला अटक; मेव्हणीचं सिम वापरुन केला प्लॅन
12
'आयाराम गयाराम' ही म्हण राजकारणात कधी आली?; आमदाराने चक्क एका दिवसात २ पक्ष बदलले
13
सुनील केदार समर्थकांच्या बंडखोरीनं मविआत संताप; ठाकरे-पवारांच्या उमेदवारांना फटका?
14
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या युवतीच्या मृत्यूचं रहस्य; फ्लॅटमध्ये आढळला मृतदेह
15
देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेत अचानक वाढ, तपास यंत्रणा अलर्ट; नेमकं काय घडलं?
16
मराठा उमेदवारांबाबत रविवारी होणार निर्णय; अंतरवली सराटीत येण्याचे मनोज जरांगेंचे आवाहन
17
वेगवेगळ्या चकमकीत 3 दहशतवाद्यांचा खात्मा; ज्या घरात अडकले होते, त्यालाच जवानांनी लावली आग
18
Rajnath Singh : "अशी परिस्थिती येईल जेव्हा..."; दहशतवादी हल्ल्यांबाबत राजनाथ सिंह यांची मोठी भविष्यवाणी
19
IND vs NZ, 3rd Test Day 2 Stumps: दुसऱ्या दिवशी १५ विकेट्स; तिसऱ्या दिवशीच फुटणार विजयाचे फटाके?
20
केरळमध्ये ट्रॅक साफ करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ट्रेनने उडवलं; चौघांचा मृत्यू, एकाचा मृतदेह सापडेना

गौरी लंकेश हत्या : हृषीकेश देवडीकरला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2020 5:59 AM

पत्रकार गौरी लंकेश हत्येप्रकरणी पोलिसांनी झारखंडच्या धनबाद येथून हृषीकेश देवडीकर याला अटक केली.

धनबाद (झारखंड) : पत्रकार गौरी लंकेश हत्येप्रकरणी पोलिसांनी झारखंडच्या धनबाद येथून हृषीकेश देवडीकर याला अटक केली. हृषीकेश उर्फ राजेशला धनबादपासून ३० किमी अंतरावर अटक करण्यात आली. हृषीकेश गेले आठ महिने कतरास येथील पेट्रोल पंपावर काम करत होता. गौरी लंकेश यांची ५ सप्टेंबर, २०१७ रोजी बंगळुरूत त्यांच्या घरासमोरच हत्या झाली होती. या प्रकरणात अटक झालेला हा १७वा आरोपी आहे. परशुराम वाघमारे याने गोळ्या चालविल्या होत्या, असा आरोप असून, तो अटकेत आहे. एक आरोपी अद्यापही फरार आहे.बंगळुरूच्या पोलिसांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केली. नंतर त्याला बंगळुरूला घेऊन गेले. बंगळुरूच्या पोलीस पथकातील अधिकारी पुनीत कुमार यांनी सांगितले की, मोबाइल लोकेशनवरून हृषीकेशला ट्रॅक करण्यात आले होते. बंगळुरू पोलिसांनी पेट्रोल पंप मालकाचीही चौकशी केली. त्यांनी सांगितले की, हृषीकेशने आपण बेरोजगार असल्याचे सांगितले होते आणि नोकरी मागितली होती. त्या मालकाने त्याला भाड्याने घरही दिले होते. एम. एम. कलबुर्गी, नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे यांच्या हत्येशीही या टोळीचा संबंध असल्याचा संशय आहे.

टॅग्स :Gauri Lankesh Murderगौरी लंकेश हत्या प्रकरण