बंगळुरू : हिंदू धर्म आणि हिंदू देवी-देवतांविरुद्ध वक्तव्ये केल्यामुळे प्रसिद्ध पत्रकार आणि कार्यकर्त्या गौरी लंकेश यांची हत्या करण्यात आली, असे या प्रकरणी दाखल झालेल्या आरोपपत्रात म्हटले आहे. दरम्यान या हत्येप्रकरणी कर्नाटक पोलिसांनी सनातनचा साधक अमित डेगवेकर याला सिंधुदुर्ग जिल्ह्यातून शनिवारी अटक केली. अमित डेकवेकर हा गोव्यातच असायचा. मडगाव बॉम्बस्फोट प्रकरणातही तो संशयीत आहे.गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणातील पहिला आरोपी के. टी. नवीनकुमार याच्याविरुद्ध विशेष तपास पथकाने (एसआयटी) ६५१ पानी आरोपपत्र दाखल केले आहे. गौरी लंकेश या हिंदू धर्म आणि देवी-देवतांविरुद्ध वक्तव्ये करीत असल्यामुळे आरोपी चिडलेले होते, असे आरोपपत्रात म्हटले आहे. नवीनकुमार आणि मद्दूर येथील त्याच्या तीन मित्रांचे जबाब एसआयटीच्या विनंतीमुळे न्यायालयाने सार्वजनिक केले नाहीत. फरार असलेल्या आरोपींना सुगावा लागू नये, यासाठी जबाब गोपनीय ठेवण्यात आलेआहेत.रूपा सी. एन. हिने जबाबात म्हटले की, आपला पती नवीनकुमार हा २0१७ मध्ये सनातन धर्म संस्थेशी संबंधित होता. तो २0१७ मध्ये एकदा आपल्याला शिवमोगा येथे कार्यक्रमाला घेऊन गेला होता. तेथे त्याने आपला सनातन धर्म संस्थेच्या लोकांशी परिचय करून दिला होता. दसऱ्याच्या तीन महिने आधी त्यानेएक पिस्तूल मिळविले. हे खोटेपिस्तूल असून माकडांना घाबरविण्यासाठी आणले आहे, असे त्याने आपल्याला सांगितले होते. दसºयाला त्याने पिस्तुलाची पूजा केली होती. (वृत्तसंस्था)सनातन संस्थेचे मात्र नाव नाहीहिंदूजागृती डॉट ओआरजी आणि सनातन डॉट ओआरजी या वेबसाईटचा फोरेन्सिक रिपोर्ट आरोपपत्राला जोडला आहे. मद्दूर येथील १0 जून २0१७ रोजीच्या बैठकीचा अहवाल या वेबसाईटवर दिलेला आहे. याच बैठकीला नवीनकुमार हजर होता. सनातन संस्थेला मात्र यात आरोपी करण्यात आलेले नाही. ही संस्था स्वत: या कटात होती, असा कोणताही पुरावा नसल्याचे आरोपपत्रात म्हटले आहे.
हिंदू धर्माविरुद्ध लिखाण केल्याने गौरी लंकेश यांची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2018 1:08 AM