शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याच्या राजकारणात काय शिजतंय?; विधानसभेपूर्वीच महायुतीत मोठा भूकंप होण्याची शक्यता
2
मुख्यमंत्रिपदाबाबत बाळासाहेब थोरातांचं विधान; नाना पटोलेंच्या नावाला विरोध?
3
शरद पवार गटाच्या मतदारसंघावर दावा; विधानसभा निवडणुकीत वसंत मोरेंची होणार कोंडी?
4
IND vs BAN : मॅचनंतर बायकोनं टाकली 'गुगली'! प्रीतीनं अशी घेतली अश्विनची फिरकी (VIDEO)   
5
६ वर्षांच्या मुलीला माकडांनी बलात्काराची शिकार होण्यापासून वाचवले, जबरदस्ती करणाऱ्या इसमाला फटकावले
6
धक्कादायक! UPSC ची तयारी करणाऱ्या युवकाचा मृतदेह जंगलात सापडला, हत्या की आत्महत्या?
7
पडळकरांकडून सरकारविरोधातच आंदोलनाचं हत्यार; रास्ता रोकोसाठी धनगर समााजाला केलं महत्त्वाचं आवाहन 
8
रेखा झुनझुनवाला यांचे सुपरहिट स्टॉक्स, २०२४ मध्ये दिलाय ८९% परतावा; पाहा कोणते आहेत शेअर्स?
9
Maharashtra Assembly Elections : हरियाणा-काश्मीरनंतर आता महाराष्ट्र विधानसभेचे बिगुल वाजणार! निवडणूक आयोगाने तयारी केली सुरू
10
Maharashtra Politics : शिवसेना शिंदे गटात पक्षातंर्गत वाद?; भरत गोगावलेंच्या गौप्यस्फोटानं उडाली खळबळ
11
सिनेट निवडणुकीत चुरस; शिंदेगटाच्या युवासेनेचे 'अभाविप'शी फाटले; पाठिंबा काढला
12
Pitru Paksha 2024: आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी पितृपक्षातील अष्टमीला करा 'गजलक्ष्मी व्रत'!
13
महाविकास आघाडीत विदर्भ-मुंबईचा तिढा; मुंबईत उद्धवसेनेला २२, तर विदर्भात काँग्रेसला हव्या ४५ जागा
14
ATM Card वर मिळतो १० लाखांपर्यंतचा फ्री इन्शूरन्स; पाहा केव्हा घेता येतो या सुविधेचा लाभ?
15
रश्मी ठाकरे पुढच्या मुख्यमंत्री...! कलानगरात झळकले बॅनर्स, राजकीय वर्तुळात चर्चा
16
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरी व व्यापारात लाभ होतील; अचानक धन प्राप्ती होईल
17
चार हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन वस्तू अमेरिका भारताला देणार; पंतप्रधानांनी मानले आभार
18
अग्रलेख : पंतप्रधान पुन्हा आक्रमक; महायुतीची सत्ता टिकविण्यासाठी भाजप पुन्हा सरसावला
19
मराठा, ओबीसी आरक्षणावरून तणाव कायम; वडीगोद्रीत दोन्ही समाजांचे आंदोलक रस्त्यावर
20
सर्व्हे सांगतात, मविआला मुंबईत २२ जागा मिळणार

Gautam Adani: गौतम अदानींनी खरेदी केली नवी कार, करोडोंमध्ये आहे किंमत, अशी आहेत वैशिष्ट्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2022 7:06 PM

Gautam Adani: अदानी यांनी चार कोटी रुपयांची कार खरेदी केली आहे. ही कार दमदार आहे सोबतच तिचे फिचरसुद्धा जबरदस्त आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार गौतम अदानी यांनी लँड रोव्हरची रेंज रोव्हर एसयूव्ही खरेदी केली आहे.

मुंबई - भारतच नाही तर जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये गौतम अदानींचा समावेश होतो.जेव्हा उद्योग व्यवसायासंबंधी एखादी बातमी येते. किंवा श्रीमंतांच्या यादीत काही चढ उतार होतो, तेव्हा गौतम अदानींच्या नावाची चर्चा होते. त्याव्यतिरिक्त बातम्यांपासून दूर राहणेच ते पसंत करतात. मात्र हल्लीच ते चर्चेचा विषय ठरले आहेत. अदानी यांनी चार कोटी रुपयांची कार खरेदी केली आहे. ही कार दमदार आहे सोबतच तिचे फिचरसुद्धा जबरदस्त आहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार गौतम अदानी यांनी लँड रोव्हरची रेंज रोव्हर एसयूव्ही खरेदी केली आहे. या गाडीची किंमत सुमारे ४ कोटी रुपये एवढी आहे. hottestcarsin नावाच्या पेजने इन्स्टाग्राम पोस्टमध्ये गौतम अदानी यांनी रेंज रोव्हर गाडीचे फोटो अपलोड केले आहेत. गौतम अदानी यांची ही कार पांढऱ्या रंगाची आहे. त्यांनी या गाडीच्या ऑटोबायोग्राफी ३.० डिझेल लॉन्ज-व्हीसेबल व्हेरिएंटला खरेदी केले आहे. हे या गाडीचं ७ सिटर व्हर्जन आहे. 

रेंज रोव्हर ऑटोबायोग्राफी ३.० डिझेलमध्ये ३००० सीसीचं इनलायनर-६ डिझेल इंजिन देण्यात आलं आहे. हे इंजिन ३४६ बीएचपीची कमाल पॉवर आणि ७०० एनएमची पीक टॉर्क आऊटपुट देते. या खास व्हेरिएंटमध्ये ८-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन आणि फोर व्हील ड्राइव्ह सिस्टिम देण्यात आले आहेत.

बाहेरच्या बाजूने तुम्हाला डीआरएलसह एलईडी हेडलाइट आणि मोठे अलॉय व्हिल्स देण्यात आले आहेत. इंटिरियरमध्ये १३.१ इंच टचस्क्रिन, चार झोन क्लायमेट कंट्रोल हेड अप डिस्प्ले वायरलेस डिव्हाइस चार्जिंग आणि ३डी सराऊंड सिस्टिम देण्यात आली आहे. अदानींच्या ताफ्यात BMW 7-Series, Toyota Vellfire, Audi Q7, Ferrari California आणि Rolls-Royce Ghost सारख्या आलिशान गाड्याही आहेत. 

टॅग्स :Adaniअदानीcarकारbusinessव्यवसाय