शहरं
Join us  
Trending Stories
1
Baba Siddique : जेलमध्ये सुपारी, ४ आठवडे रेकी, ३ शूटर, ६ गोळ्या...; सिद्दिकी हत्या प्रकरणातील धक्कादायक खुलासे
2
परदेश दौऱ्यावर जाण्यापूर्वी राष्ट्रपतींचा मोठा निर्णय; जम्मू काश्मीरच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा मार्ग मोकळा केला
3
भीषण! गाझामधील शाळेवर इस्रायलचा एअर स्ट्राईक; लहान मुलांसह २० जणांचा मृत्यू, अनेक जखमी
4
छ. संभाजीनगरमध्ये पोलीस उपायुक्तांच्या मुलाने आयुष्य संपविले; आई - बाबांसाठी आरशावर लिहिली नोट
5
मारेकरी येऊन गेले होते सिद्दीकींच्या कार्यालयात, ...अन् फटाक्यांच्या आवाजात साधला नेम
6
जयशंकर पोहोचण्यापूर्वी इस्लामाबादमध्ये लष्कर तैनात; पाकिस्तानात दंगे भडकले
7
अंबानी कुटुंबीय १५००० कोटींच्या अँटिलियातील कोणत्या मजल्यावर राहतं माहितीये, कोणाला येण्याची परवानगी?
8
बाबा सिद्दीकींची हत्या करणाऱ्या धर्मराजचा बनाव उघड; समोर आली महत्त्वाची माहिती
9
बाबा सिद्दिकी हत्या प्रकरण : एक आरोपी म्हणाला, मै 17 साल का हूँ...! त्या आरोपीचे वय २१, १९, की १७?
10
भौम प्रदोष: ‘असे करा’ व्रत, महादेव होतील प्रसन्न; मंगळ दोषातून दिलासा, हनुमंत करतील कृपा
11
बाबा सिद्दीकी हत्येच्या कटाचे पुणे ‘कनेक्शन’
12
कोजागरी नवान्न पौर्णिमा: ५ राशींना अनुकूल, नोकरी-व्यापारात यश; इच्छापूर्ती, सुख-सौभाग्य काळ!
13
गुरुचरित्र आपल्याला नेमके काय शिकवते? ११ गोष्टी कालातीत, आजही येते प्रचिती; पाहा, गुरुपदेश
14
हिजबुल्लाहचा इस्रायलवर भीषण ड्रोन हल्ला; चार सैनिकांचा मृत्यू, ६० हून गंभीर जखमी
15
आजचे राशीभविष्य: ७ राशींना अनुकूल, धनलाभ योग; नोकरीत शुभवार्ता, प्रसन्नतेचा दिवस
16
एकत्र फोटोमुळे आरोपींची ओळख पटवण्यात आले यश
17
बिश्नोई गँगने स्वीकारली बाबा सिद्दीकींच्या हत्येची जबाबदारी? फेसबुक पोस्ट व्हायरल; आरोपी म्हणाला- 'मै १७ साल का...'
18
महाविकास आघाडीने केला ‘गद्दारांचा पंचनामा’; संयुक्त पत्रकार परिषदेतून महायुती सरकारवर निशाणा
19
तुरुंगातून बाहेर येताच आखला बाबा सिद्दीकींच्या हत्येचा कट; मुंबई, पुण्यात राहून रेकी, अडीच ते तीन लाखांची सुपारी
20
काँग्रेस नेते आज दिल्ली दरबारी; आढावा घेणार

Coromandal Express Accident: गौतम अदानी यांची मोठी घोषणा; कोरोमंडल ट्रेन अपघातातील मृतांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलणार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2023 6:26 PM

ओडिशा ट्रेन अपघातात आतापर्यंत सुमारे 288 जणांचा मृत्यू झाला अहे तर 1100 हून अधिक जखमी झाले आहेत.

Coromandal Express Accident: ओडिशातील कोरोमंडल एक्सप्रेस ट्रेन अपघाताने संपूर्ण देश हादरला आहे. सरकारने मृत आणि जखमींना मदत जाहीर केली आहे. यातच आता अदानी समूहाचे प्रमुख गौतम अदानी यांनी मोठी घोषणा केली आहे. अपघातात आई-वडील गमावलेल्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी अदानी समूह घेणार असल्याची माहिती त्यांनी ट्विटद्वारे दिली. ओडिशा दुर्घटनेत आतापर्यंत सुमारे 288 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर 1100 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. यामध्ये लहान मुले, वृद्धांसह अनेकांचा समावेश आहे. 

तांत्रिक चुकीमुळे कोरोमंडल ट्रेन अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. आता या अपघाताची उच्चस्तरीय चौकशी केली जात आहे. पंतप्रधानांपासून ते रेल्वे मंत्रालयापर्यंत आणि इतर राज्य सरकारे या संकटकाळात मृत आणि पीडितांच्या कुटुंबियांसोबत आहेत. पंतप्रधान मोदींनीही घटनेचा आढावा घेतल्यानंतर दोषींना सोडले जाणार नाही, असे सांगितले आहे.

काय म्हणाले  गौतम अदानी ?उद्योगपती उद्योगपती गौतम अदानी यांनी रविवारी ट्विट केले की, ''ओडिशातील रेल्वे अपघातामुळे मला खूप दुःख झाले आहे. लोकांचा त्रास काही प्रमाणात कमी करण्यासाठी अदानी समूहाने अपघातात त्यांचे पालक गमावलेल्या मुलांच्या शालेय शिक्षणाची जबाबदारी उचलण्याचा निर्णय घेतला आहे. पीडितांना आणि त्यांच्या कुटुंबियांना धीर देणे आणि मुलांचे भविष्य चांगले करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.''

रेल्वेकडून 10लाख मदतमृतांच्या वारसांना रेल्वे मंत्रालयाकडून 10 लाखांची, गंभीर जखमींना 2 लाख तर किरकोळ जखमींना प्रत्येकी 50 हजारांची मदत जाहीर झाली. त्याशिवाय पंतप्रधान साहाय्यता निधीतून मृतांच्या वारसांना दोन लाख, तर जखमींना प्रत्येकी 50 हजारांची मदत जाहीर केली आहे. याशिवाय तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही आपापल्या राज्यातील पीडितांच्या कुटुंबीयांना भरपाई देण्याची घोषणा केली आहे.

टॅग्स :Odisha Coromandel Express Accidentओडिशा कोरोमंडल एक्सप्रेस अपघातDeathमृत्यूOdishaओदिशाGautam Adaniगौतम अदानी