नवी दिल्ली : माजी क्रिकेटपटू व भाजपचे खासदार गौतम गंभीर यांच्या फाउंडेशने कोरोना औषधांचा अनधिकृरीत्या साठा केला असे दिल्लीच्या औषध नियंत्रकांनी केलेल्या चौकशीत आढळून आले आहे. या प्रकरणात गौतम गंभीर फाउंडेशन दोषी आढळल्याची माहिती औषध नियंत्रकांनी दिल्ली उच्च न्यायालयाला गुरुवारी दिली.कोरोना औषधाचा अवैध साठा आप पक्षाचे आमदार प्रवीणकुमार यांनीही केला होता, असा ठपका दिल्लीच्या औषध नियंत्रकांनी केलेल्या चौकशीत ठेवला आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने औषध नियंत्रकांच्या वकील नंदिता राव यांना विचारणा केली की, केवळ गौतम गंभीर फाउंडेशनच्या प्रकरणाबाबतच औषध नियंत्रकांनी स्थितीदर्शक अहवाल सादर केला आहे? की त्यात आमदार प्रवीणकुमार प्रकरणाचाही उल्लेख आहे? गौतम गंभीर फाउंडेशन व आमदार प्रवीणकुमार हे दोघेही दोषी आढळून आल्याचे वकील नंदिता राव यांनी न्यायालयाला सांगितले.
गंभीरने केला औषधांचा अनधिकृत साठा; न्यायालयात माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2021 6:46 AM