नवी दिल्ली - क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारून राजकारणाच्या मैदानात सक्रीय झालेला गौतम गंभीर सध्या त्याचा आक्रमक वक्तव्यांमुळे चर्चेत आहे. दरम्यान, गौतम गंभीर आणि जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांच्यात सध्या काश्मीर प्रश्नावरून खडाखडी सुरू आहे. बुधवारी ट्विटरवर रंगलेल्या जुगलबंदीनंतर मेहबुबा मुफ्ती यांनी गौतम गंभीरला ब्लॉक केले होते. आता गंभीरने त्याला प्रत्युत्त दिले असून, मला ब्लॉक कराल, पण देशातील 130 कोटी जनतेला कधीपर्यंत ब्लॉक कराल? अशी विचारणा गंभीरने केली आहे. ट्विरवर रंगलेल्या वादानंतर मेहबुबा मुफ्ती यांनी गौतम गंभीरला ब्लॉक केले होते. दरम्यान, या प्रकारावरून गौतम गंभीरने मेहबूबा यांना प्रत्युत्तर दिले आहे. गंभीर म्हणाला, मेहबूबा मुफ्ती मला ब्लॉक करू शकतात. पण 130 कोटी लोकसंख्या असलेल्या देशातील जनतेला कधीपर्यंत ब्लॉक करून ठेवतील, कधीपर्यंत सीमेपलीकडच्या बाबींची चर्चा करणार. या देशात एक लाट आहे आणि मेहबूबा प्रवाहासोबत राहिल्या नाहीत. तर बुडून जातील.'' असा इशारा गंभीरने दिला.
मला ब्लॉक कराल; 130 कोटी जनतेचे काय करणार? गौतम गंभीरचं मेहबुबा मुफ्तींना प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2019 6:49 PM