नवी दिल्ली : राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी निवासस्थानी झालेल्या मंत्री, आमदारांच्या बैठकीत 107 आमदार असल्याचे सांगत विजयाचे चिन्ह दाखविले. परंतू पाय़लट गटाने गेहलोत यांच्याकडे 84 आमदार असल्याचे सांगितल्याने उपस्थित आमदारांना हॉटेलवर हलविण्याची वेळ राजस्थान सरकारवर आली आहे. या घडामोडींमध्ये भाजपानेही बहुमत चाचणीची मागणी केल्याने राजस्थानमध्ये संकट टळले नसल्याचेच चिन्ह आहे.
एएनआयनुसार सचिन पायलट यांच्यासह 20 आमदार या बैठकीला गैरहजर होते. तर पायलट यांच्या जवळच्या नेत्याने गेहलोत यांना काँग्रेसच्या 84 आमदारांचाच पाठिंबा असून बाकीचे आमच्या बाजुने असल्याचे म्हटले आहे. तसेच पायलट यांचे पक्षाच्या वरिष्ठांसोबत कोणतेही बोलणे झालेले नसल्याचेही या नेत्याने सांगितले आहे.
या साऱ्या घडामोडींवर भाजपाने संधी साधली आहे. भाजपा आयटी सेलचे प्रमुख अमित मालविय यांनी सांगितले की, अशोक गेहलोत यांनी बहुमत सिद्ध करण्यासाठी लगेचच फ्लोअर टेस्ट द्यावी. जर ते त्यांच्या आमदारांना रिसॉर्टवर नेत असतील तर स्पष्ट आहे की त्यांच्याकडे पुरेसे आकडे नाहीत आणि ते केवळ सत्य टाळायचा प्रयत्न करत आहेत.
राज्यपालांकडे नेण्याचे सोडून हॉटेलमध्ये कशाला? तर दुसरीकडे सचिन पायलट यांत्या जवळच्या नेत्याने एनआयएला सांगितले की , गेहलोत यांच्याकडे पुरेसे संख्याबळ नाही जेवढे ते दावा करत आहेत. मुख्यमंत्र्यांचे गार्डन हे काही बहुमत सिद्ध करण्यासाठी नसते. ते विधानसभेत करावे लागते. जर त्यांनी दावा केलाच आहे तर त्या आमदारांची मोजणी का नाही करत. त्यांना राज्यपालांकडे घेऊन जाण्यापेक्षा हॉटेलमध्ये का नेत आहेत, असा सवाल केला आहे.
कॅबिनेट मंत्री रमेश मीना यांनी उघडपणे पायलट गटात असल्याचे समर्थन केले आहे.
राजस्थानमध्ये व्हीप जारी करण्यात आला असून जो कोणी काँग्रेस आमदार किंवा नेता पक्षविरोधी कारवाया करेल त्याच्याविरोधात कठोक कारवाई केली जाणार आहे. तर दुसरीकडे पायलट यांना चर्चेसाठी काँग्रेसच्या नेत्यांनी बोलावले आहे. आम्हाला तुमच्याप्रती आदर आहे. तुमचा आम्ही सन्मान करतो. खुल्या दिलाने आम्ही तुमचे स्वागत करण्यासाठी तयार आहोत. कृपया माघारी या आणि चर्चा करा, असा संदेश पाठविण्यात आला आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या...
OnePlus Nord चे फिचर्स लीक; स्वस्त फोनमध्ये 6 कॅमेऱ्यांचा सेटअप आणि बरेच काही
सॅमसंगची फ्रिजवर ऑफर! 38 हजारांचा स्मार्टफोन मोफत; 9 हजारांचा कॅशबॅकही
शूट टू किल! एक गोळी दुश्मन खल्लास; जवानांना मिळणार खतरनाक अमेरिकी रायफल
कोरोना पाठ सोडेना! बरा होतोय पण दोन महिन्यांनंतर दिसताहेत ही गंभीर लक्षणे