शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

'गेहलोत आऊट, दिग्विजय सिंग इन'; मुख्यमंत्रिपदाचा निर्णय सोनिया गांधी घेणार, गेहलोत यांचं वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2022 6:14 AM

राजस्थानातील राजकीय नाट्यानंतर काँग्रेसमधील राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे.

राजस्थानातील राजकीय नाट्यानंतर काँग्रेसमधील राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह हे आता अध्यक्षपदाचे उमेदवार असतील. आज, शुक्रवारी ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. शशी थरूर यांच्याशी त्यांची लढत होईल.

पक्षाच्या केंद्रीय निवडणूक प्राधिकरण कार्यालयातून अर्ज घेतल्यानंतर दिग्विजय सिंह म्हणाले, १० अर्ज घेतले आहेत. उद्या अर्ज दाखल करेन. आपण अध्यक्षपदाच्या शर्यतीत आहात काय, असे विचारले असता ते म्हणाले, अर्ज परत घेण्याच्या तारखेपर्यंत प्रतीक्षा करा. आपण हे सर्व गांभीर्याने का घेत नाही, असे ते मिश्किलपणे उत्तरले. दिग्विजय सिंह हे शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार असून, त्यासाठी मध्य प्रदेशातील काँग्रेसचे आमदार नवी दिल्लीत दाखल होत आहेत.

मुख्यमंत्रिपदाचा निर्णय सोनिया गांधी घेतील : गेहलोत 

 

 

  • अशोक गेहलोत यांनी गुरुवारी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतली. जयपूरमध्ये काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक होऊ न शकणे आणि संबंधित घटनाक्रमावर आपण सोनिया यांची माफी मागितल्याचे त्यांनी पत्रकारांना सांगितले.  
  • आपण आता अध्यक्षपदाची निवडणूक लढणार नसून आपल्या मुख्यमंत्रिपदाबाबतचा निर्णयही सोनिया गांधीच घेतील, असे गेहलाेत म्हणाले. 
  • राजस्थानातील घटनाक्रमामुळे मी मुख्यमंत्री राहू इच्छितो त्यासाठी हे सर्व होत आहे, असा चुकीचा संदेश देशात गेला. 

आमची मैत्रीपूर्ण लढत : थरुर दिग्विजय सिंह यांनी गुरुवारी शशी थरुर यांची भेट घेतली. त्यानंतर दिग्विजय म्हणाले की, मी थरुर यांची भेट घेतली आणि त्यांनी सांगितले की, आमची लढाई ही मैत्रीपूर्ण आहे. थरुर यांनी ट्वीट करीत म्हटले आहे की, आज दुपारी दिग्विजय सिंह यांची भेट घेतली. त्यांच्या उमेदवारीचे मी स्वागत करतो. 

मुख्यमंत्रिपदाबाबत दोन दिवसांत निर्णय काँग्रेसचे संघटन सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी गुरुवारी सांगितले की, पक्षाध्यक्ष सोनिया गांधी एक-दोन दिवसांत राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदाबाबत निर्णय घेतील.

टॅग्स :Ashok Gahlotअशोक गहलोतSonia Gandhiसोनिया गांधीcongressकाँग्रेसDigvijaya Singhदिग्विजय सिंह