मध्य प्रदेश येथील ऑर्डिनेंस फॅक्टरी कटनी ( ओएफके) च्या इंजीनियर्सनी एके-47 आणि इंसास रायफलच्या बुलेटच्या ग्लिडिंग मेटल कप ( खोका) बनवणारी मशीन दुरुस्त करून नवीन इतिहास रचला. या मशीनची दुरुस्ती यापूर्वी परदेशातील कंपनींकडून केली जात होती. यावेळी या मशीनच्या दुरुस्तीसाठी जर्मनीच्या कंपनीनं तयारी दर्शवली होती आणि त्यासाठी त्यांनी 50 लाख रुपयांची मागणी केली होती. त्यांच्या या मागणीनंतर ओएफकेच्या इंजिनियर्सनी पुढाकार घेतला आणि एक वर्षापासून बंद पडलेली मशीनची तीन महिन्यांत अवघ्या दीड लाखांत दुरुस्ती केली. आता दोन्ही शस्त्रांच्या मागणीनुसार उप्तादन केले जाणार आहे.
आत्मनिर्भरतेच्या या घटनेची विशेष गोष्ट म्हणजे मशीनसाठी लागणारे पार्ट्स आयात केले गेले नाहीत. ओएफकेच्या इंजिनियर्सनी स्थानिक स्तरावर ते पार्ट्स तयार केले आणि मशीन सुरू केली. त्यांनी मशीनचा ड्राईव्ह इलेक्ट्रॉनिकवरून बदलून मॅन्युअल केला. ओएफकेचे महाप्रबंधक वीपी मुंघाटे यांनी सांगितले की,''ही मशीन एक वर्षापासून बंद होती. स्थानिक इंजिनियर्सनी त्याची दुरूस्ती केल्यानंतर इंसास रायफलच्या बुलेटसाठीचा 5.56 ग्लिडिंग मेटल कप आणि एके 47 ग्लिडिंग मेटल कप तयार केला जाणार आहे.''
आत्मनिर्भर भारताच्या स्वप्नाला पूर्ण करण्यासाठी ओएफकेच्या टीमचा महत्त्वाचा वाटा आहे. आता इंसास रायफल आणि एके 47च्या ग्लिडिंग कपची मागणी वाढल्यास त्याचे उप्तादन मोठ्या प्रमाणात या मशीनमधून करण्यात येईल. दुरुस्तीचं काम करताना मशीनमधील आयात केलेले अनेक पार्ट्स खराब झाले होते आणि इंजिनियर्सनी ओएफकेमध्येज ते पार्ट्स तयार केले आणि मशीन पुन्हा नव्या सारखी तयार केली.