शहरं
Join us  
Trending Stories
1
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
2
महाराष्ट्रात ब्ल्यू इकोनॉमीला चालना, रोजगाराच्या लाखो संधी...: PM नरेंद्र मोदींचं आश्वासन
3
"ठाकरेंच्या कुठल्याच व्यक्तीला काही बोलणार नाही, बाळासाहेबांना वचन दिलेले"; नारायण राणे उद्धव ठाकरेंना प्रत्यूत्तर देणार?
4
राहुल गांधींनीच मला आणि सुजयला पक्षाबाहेर ढकललं; राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
5
“महायुतीविरोधात तीव्र संताप, १७५ जागांसह मविआचे सरकार येणार”; नाना पटोलेंचा मोठा दावा
6
"विराटचं काहीतरी बिनसलंय, संघात असूनही तो रोहित अन् गंभीरशी..."; माजी क्रिकेटपटूचा दावा
7
Exclusive: "आम्ही दोघी समोरासमोर उभं राहून...", मराठी अभिनेत्रीने सांगितला 'सिंघम अगेन'मध्ये दीपिकासोबत काम करण्याचा अनुभव
8
परीक्षार्थींच्या आंदोलनासमोर युपीपीएससी नमली; एकाच दिवशी, एकाच शिफ्टमध्ये परीक्षा होणार
9
पुन्हा बॅगा तपासल्या! तिसऱ्यांदा तपासणीवर उद्धव ठाकरेंचा रोखठोक प्रश्न; अधिकारी म्हणाले...
10
‘बांगलादेशात ९० टक्के मुस्लिम, सेक्युलर शब्दाची आवश्यकता नाही’, मोहम्मद युनूस सरकार मोठा निर्णय घेणार? 
11
'RBI ने व्याजदर कमी करावेत' गोयल यांच्या मागणीवर गव्हर्नर दास यांचं एका वाक्यात उत्तर
12
कर्नाटकात भाजप ‘ऑपरेशन लोटस’ चालवत आहे; मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनंतर शिवकुमारांचा दावा
13
जरी मला मुख्यमंत्री केले तरी मी होणार नाही; 'महाराष्ट्राचा सीएम कोण'वर असे का बोलले नितीन गडकरी?
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'१५०० दिलेत, महायुतीला मत दिले नाही तर ३००० वसुल करणार'; भाजपा महिला नेत्याचं वादग्रस्त विधान
15
Ranji Trophy : एका डावात दोघांची ट्रिपल सेंच्युरी; डाव घोषित केल्यामुळं हुकली वर्ल्ड रेकॉर्डची संधी
16
महाराष्ट्राच्या रणांगणात ४० लाख उत्तर भारतीय मतदार; मुंबईत २२ जागांवर निर्णायक मते
17
"मला हा सिनेमा पाहायचा नव्हता कारण.."; सविता मालपेकर यांचं '..आणि डॉ. काशिनाथ घाणेकर'बद्दल रोखठोक मत
18
‘बटेंगे तो कटेंगे’,‘एक हैं तो सेफ हैं’वर जरांगेंची टीका; म्हणाले, “मराठा हिंदूतील मोठा समाज”
19
"अदानींचं विमान वापरायचं, गौतमभाई म्हणत सोबत ढोकळा चटणी खायची आणि नंतर…’’, नितेश राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका
20
"नितीन गडकरी चांगले नेते, पण देवाभाऊ..."; सुप्रिया सुळे यांचा फडणवीसांवर निशाणा

मुलींनो दहावी पास व्हा आणि मिळवा 10 हजारांचं बक्षीस

By admin | Published: June 06, 2017 11:55 AM

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तरप्रदेशातील मुलींचं मनोधैर्य वाढवणारी खास योजना जाहीर केली आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 6- उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तरप्रदेशातील मुलींचं मनोधैर्य वाढवणारी खास योजना जाहीर केली आहे. तेथे दहावी पास होणाऱ्या मुलींना दहा हजार रूपयांचं बक्षीस योगी सरकारकडून दिलं जाणार आहे. उत्तर प्रदेशचे
उप-मुख्यमंत्री दिनेश शर्मा यांनी सोमवारी ही घोषणा केली आहे. शनिवारी सीबीएसई बोर्डाचा निकाल  जाहीर झाला होता पण उत्तर प्रदेश बोर्डाचा निकाल येणं अजून बाकी आहे. याच पार्श्वभूमिवर बक्षीस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यंदा 90.95 टक्के सीबीएसई बोर्डाचा निकाला लागला आहे गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये पाच टक्क्यांनी निकालात घसरण झाली.
 
यंदा मार्च 9 ते एप्रिल 10 या कालावधीत दहावीची परीक्षा झाली होती. पंजाब, मणिपूर, गोवा, उत्तराखंड आणि उत्तरप्रदेश या पाच राज्यांच्या निवडणुका असल्याने परीक्षा घ्यायला नेहमीपेक्षा उशीर झाला होता. उशीर झालेल्या परीक्षेमुळे निकाल यायलाही उशीर होतो आहे. 
 
याआधी उत्तर प्रदेश सरकारने गरीब मुस्लीम कुटुंबातील मुलींच्या लग्नासाठी मदत जाहीर केली होती. "योगी आदित्यनाथ यांनी अल्पसंख्यांक समूदायात असणाऱ्या गरीब कुटुंबातील  मुलींच्या सामूहिक विवाह सोहळ्याला संमती दिली आहे. राज्य सरकारच्या 100 दिवसांच्या कार्यक्रमात आम्ही या नव्या योजनेची आखणी केली असल्याचं", अल्पसंख्यांक व्यवहार राज्यमंत्री मोहसीन रझा यांनी सांगितलं आहे.
 
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा सोमवारी पंचेचाळीसाव्वा वाढदिवस होता. त्यासाठी आयोजीत एका कार्यक्रमात दहावीची परीक्षा पास करणाऱ्या मुलींना दहा हजार रूपये बक्षीस देण्याचं जाहीर करण्यात  लं आहे.