नवी दिल्ली : राष्ट्रीय पेन्शन यंत्रणेची (एनपीएस) किमान परताव्याची हमी देणारी योजना लवकरच आणली जाणार आहे, अशी माहिती पेन्शन फंड नियामकीय व विकास प्राधिकरणाचे (पीएफआरडीए) अध्यक्ष सुप्रतिम बंदोपाध्याय यांनी दिली आहे.
बंदोपाध्याय यांनी सांगितले की, या योजनेस येत्या ७ ते १० दिवसांत मंजुरी मिळू शकते. आगामी ४ महिन्यांत ही योजना सुरू होऊ शकते. या योजनेसाठी १० फंड व्यवस्थापकांची नियुक्ती करण्यात आली आहे. व्यवस्थापनाधीन संपत्तीपैकी १७ टक्के रक्कम समभागांत गुंतविली जाईल.
ही असेल अट
किमान हमी परतावा योजनेत ५० वर्षांपेक्षा कमी वयाचे लोकच सहभागी होऊ शकतील. किमान योगदान वार्षिक ५ हजार असेल.
असा मिळेल परतावा
मागील १३ वर्षांतील एनपीएसचा सरासरी वार्षिक परतावा १० टक्के राहिला. नव्या योजनेत४ ते ५ टक्के परताव्याची हमी दिली जाईल.