शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
2
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
3
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
4
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
5
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
6
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
7
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
8
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
9
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
10
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
11
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
12
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
13
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
14
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
15
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

आंतरधर्मीय विवाह करा आणि ५० हजार मिळवा, या भाजपाशासित राज्याने आणली योजना

By बाळकृष्ण परब | Published: November 22, 2020 12:11 PM

Inter faith marriage : काही भाजपाशासित राज्यांनी लव्ह जेहादविरोधात कडक कायदा करण्याच्या दिशेने पावले उचलल्याने मोठा वाद निर्माण झालेला आहे.

देहराडून -काही भाजपाशासित राज्यांनी लव्ह जेहादविरोधात कडक कायदा करण्याच्या दिशेने पावले उचलल्याने मोठा वाद निर्माण झालेला आहे. एकीकडे मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि हरियाणासारखी भाजपाशासित राज्ये लव्ह जेहादविरोधात आक्रमक असताना भाजपाचीच सत्ता असलेल्या उत्तराखंडमधील सरकारने मात्र आंतरधर्मीय आणि आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देण्यासाठी असा विवाह करणाऱ्या जोडप्यांना प्रोत्साहन म्हणून ५० हजार रुपये देण्याची योजना सुरू केली आहे.एका वृत्तानुसार उत्तराखंड सरकारकडून ही रोख त्या सर्व जोडप्यांना मिळत आहे ज्यांचा विवाह वैधरीत्या नोंदणी केलेला आहे. ही माहिती राज्य समाजकल्याण विभागाच्या एका अधिकाऱ्याने दिली आहे. आंतरजातीय विवाहासाठीची ५० हजार रुपयांची प्रोत्साहन रक्कम मिवळण्यासाठी एक अट ठेवण्यात आली आहे. त्यानुसार पती किंवा पत्नी यांच्यापैकी एकजण कलम ३४१ मध्ये नोद असलेल्या अनुसूचित जातींमधील असावा.टेहरीचे सामाजिक कल्याण अधिकारी दीपांकर घिडिया यांनी सांगितले की, अन्य जाती आणि अन्य धर्मामध्ये विवाह करणाऱ्यांना देण्यात येणारी रक्कम राष्ट्रीय ऐक्याला प्रोत्साहन देण्यामध्ये महत्चपूर्ण ठरू शकते. या योजनेचा फायदा घेण्यासाठी विवाहाच्या एक वर्षाच्या आत अर्ज देणे आवश्यक आहे.यापूर्वी या योजनेंतर्गत आंतरजातीय आणि आंतधर्मीय विवाह करणाऱ्यांना १० हजार रुपयांची प्रोत्साहन रक्कम देण्यात येत असे. मात्र २०१४ मध्ये राज्य सरकारने उत्तर प्रदेश आंतरजातीय आंतरधर्मीय विवाह प्रोत्साहन नियमावली १९७६ मध्ये दुरुस्ती करून ही रक्कम १० हजारांवरून ५० हजार एवढी केली. २००० मध्ये वेगळ्या राज्याची निर्मिती झाली असताना उत्तराखंडने हा कायदा उत्तर प्रदेशकडून घेतला होता.

 

टॅग्स :marriageलग्नBJPभाजपाGovernmentसरकारPoliticsराजकारण