ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 09 - आनंदी राहण्यासाठी अनेक पर्याय सोशल मीडियाच्या माध्यमातून चर्चेत असतात. अशाच पर्यायांपैकी एक म्हणजे स्वत:चेच कपडे काढण्याचा. तुम्हाला विश्वास बसला नसेल ना ? पण हो, स्वत:चे कपडे काढल्यानंतर व्यक्तीला आनंद मिळतो, असे एका संशोधनाअंती समोर आले आहे. न्युडिजम मनोविकारांचा अभ्यास करणा-या संशोधकांनी केलेल्या संशोधनानुसार अशा अनेक गोष्टी आपल्यासमोर येतील. त्याबाबत जाणून घेणे गरजेचे आहे. नैसर्गिकरीत्या होत असलेल्या घडामोडींमध्ये भाग घेणारे लोक आपल्या शरीर आणि जीवनाविषयी सकारात्मक अनुभव घेतात. जितके जास्त न्युड व्हाल तिकडे जास्त स्वत: खूश राहाल. न्युड व्यक्तींनी ब-याचदा असा दावा केला आहे. परंतु यावर कोणताही शोध घेण्यात आला नाही, असे लंडन स्थित गोल्डस्मिथ युनिव्हर्सिटीचे मुख्य संशोधन डॉक्टर केऑन वेस्ट यांनी सांगितले. ज्यावेळी एखादी व्यक्ती स्वत:चे कपडे काढत असल्यास त्याला वेडा समजू नका, असेही केऑन वेस्ट म्हणाले.दरम्यान, या संशोधनातून असा सुद्धा निष्कर्ष काढण्यात आला आहे की, स्वत: न्युड होण्यापेक्षा दुसरा एखादा न्युड झाला, तर जास्त आनंद मिळतो. 'जर्नल ऑफ हॅपिनेस स्टडिज'मध्ये' हा निष्कर्ष प्रकाशित करण्यात आला होता.