नवी दिल्ली- दिल्लीला लागून असलेल्या गाझियाबादच्या एका हॉटेलमध्ये थुंकी लावून तंदूर रोटी भाजतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हिंदू रक्षा दलाच्या तक्रारीनंतर, शहर पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे. सिव्हिल लाइन चौकीचे प्रभारी शिशुपाल सोलंकी यांनी दिलेल्या माहितीनुसार, तमीजुद्दीन असे आरोपीचे नाव असून, तो बिहारच्या किशनगंजचा रहिवासी आहे. (Ghaziabad Muslim hotel cook arrested)
तमीजुद्दीन येथील पंचवटीच्या अहिंसा वाटिकेत असलेल्या एका चिकन पॉइंटवर तंदूर रोटी तयार करत होता. याशिवाय, तमीजुद्दीनसोबतच ढाबा चालविणारा शादाब आणि साहिल यांच्या विरोधातही हिंदू रक्षा दलाचे प्रदेश संयोजक गौरव सिसौदिया यांनी तक्रार दिली असल्याचे समजते. यात संबंधित व्हिडिओ दोन दिवसांपूर्वीचा असल्याचेही सांगण्यात आले आहे.
हा 59 सेकेंदाचा व्हिडिओ त्यांना शनिवारी सायंकाळी मिळाला. यानंतर ते तबडतोब संबंधित ढाब्यावर पोहोचले. हा व्हिडिओ दाखवून त्यांनी असे करण्यामागचे कारण विचारले. यावर आरोपीने त्यांच्यासोबत आरेरावी केली. यानंतर त्यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली.
यानंतर, पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून आरोपीला अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हायरल व्हिडिओमध्ये तमीजुद्दीन रोटीला तंदूरमध्ये लावण्यापूर्वी त्यावर थुंकताना दिसत आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.