नवी दिल्ली :
माजी केंद्रीय मंत्री गुलाम नबी आझाद यांनी गांधी कुटुंबावर नको त्या उद्योगपतींशी संबंध असल्याचा आरोप केल्यानंतर काँग्रेसने सोमवारी त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. आझाद हे आपले खरे चरित्र आणि पंतप्रधान मोदींप्रति आपली निष्ठा दाखवण्यासाठी नैतिकदृष्ट्या दररोज खाली घसरत आहेत, अशी टीका काँग्रेसने केली आहे.पक्षाचे सरचिटणीस जयराम रमेश यांनीही सांगितले की, त्यांचे क्षुद्र विधान दर्शवते की आझाद स्वतःला राजकारणात ठेवण्यासाठी किती चिंतित आहेत. प्रत्येक दिवशी त्यांची घसरण होत आहे.
अदानी प्रकरणावरील राहुल गांधींच्या एका ट्वीटमध्ये त्यांच्या नावाचा उल्लेख केल्याच्या प्रश्नाला उत्तर देताना आझाद यांनी आरोप केला की राहुल गांधी आणि त्यांच्या कुटुंबाचे अनेक उद्योगपतींशी संबंध आहेत, त्यापैकी काही असे आहेत की ज्यांना टाळले जाते.
१० उदाहरणे देऊ शकतोएका मुलाखतीत माजी केंद्रीय मंत्री गुलाम नबी आझाद म्हणाले, “मला गांधी कुटुंबाबद्दल खूप आदर आहे, त्यामुळे मला त्यांच्या कुटुंबाविरोधात काहीही बोलायचे नाही. नाहीतर मी अशी १० उदाहरणे देऊ शकतो जिथे ते परदेशात जाऊन नको त्या उद्योगपतींना भेटतात.”