Ghulam Nabi Azad: काँग्रेसमध्ये गळती सुरुच; आजाद यांच्या समर्थनार्थ 6 माजी आमदारांचा राजीनामा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2022 08:23 PM2022-08-26T20:23:30+5:302022-08-26T20:23:39+5:30

Ghulam Nabi Azad: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी पक्ष नेतृत्वावर आरोप करत पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला.

Ghulam Nabi Azad: Jammu kashmir: wave of resignations in support of Ghulam Nabi Azad, 6 former MLA left congress | Ghulam Nabi Azad: काँग्रेसमध्ये गळती सुरुच; आजाद यांच्या समर्थनार्थ 6 माजी आमदारांचा राजीनामा

Ghulam Nabi Azad: काँग्रेसमध्ये गळती सुरुच; आजाद यांच्या समर्थनार्थ 6 माजी आमदारांचा राजीनामा

Next

Ghulam Nabi Azad:काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी आज(शुक्रवार) काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. आझाद यांनी आपल्या राजीनाम्यात काँग्रेस हायकमांडवर हल्ला चढवला असून जम्मू-काश्मीरमध्ये आपला नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली आहे. आझाद यांच्या राजीनाम्यानंतर जम्मू-काश्मीरमधील अनेक बडे नेते त्यांच्या समर्थनार्थ राजीनामे देत आहेत. आतापर्यंत काँग्रेसच्या 6 माजी आमदारांनी राजीनामा दिला आहे.

आज काँग्रेसमधून राजीनामा दिलेल्या 6 माजी आमदारांमध्ये जीएम सरोरी, हाजी अब्दुल रशीद, मोहम्मद अमीन भट, गुलजार अहमद वाणी, चौधरी मोहम्मद अक्रम आणि आरएम चिब यांच्या नावांचा समावेश आहे. हे सर्व नेते काँग्रेसचे आमदार राहिले आहेत. आरएस चिब आणि जीएम सरोरी हे देखील जम्मू-काश्मीरमधील काँग्रेस सरकारच्या काळात मंत्री राहिले आहेत.

सरोरी आणि रशीद हे काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष होते
जीएम सरोरी आणि हाजी अब्दुल रशीद हे जम्मू-काश्मीरमध्ये पक्षाचे राज्य उपाध्यक्षही राहिले आहेत. याशिवाय अमन भट हे युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष राहिले आहेत. गुलजार अहमद हे अनंतनाग जिल्ह्याचे पक्षाध्यक्ष होते. चौधरी मोहम्मद अक्रम हे एसटी सेलचे अध्यक्ष होते.

जयराम रमेश यांचा आझादांवर निशाणा
इकडे काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांच्यावर हल्लाबोल करत आहेत. काँग्रेसचे प्रवक्ते जयराम रमेश म्हणाले की, ज्या व्यक्तीचा काँग्रेस नेतृत्वाने सर्वाधिक आदर केला, त्याच व्यक्तीने काँग्रेस नेतृत्वावर वैयक्तिक हल्ला करून आपले खरे चारित्र्य दाखवले आहे. आधी मोदींचे संसदेत अश्रू, मग पद्मविभूषण, मग घराचा विस्तार... हा योगायोग नसून सहकार्य आहे.

खुर्शीद म्हणाले - ही परिपक्वता नाही
काँग्रेस नेते सलमान खुर्शीद म्हणाले की, राहुल गांधी आमचे नेते आहेत आणि राहतील. राहुल गांधींशी आमचे व्यवहारीक संबंध नाहीत. पक्षासाठी काहीही करणे हे आपले कर्तव्य आहे. एवढ्या क्षुल्लक गोष्टीवर दीर्घकाळ पक्षाशी निगडित असलेले लोक हार मानतात ही परिपक्वता नाही. आम्ही कुठेही जाऊ शकत नाही, असे नाही, पण आम्ही जाणार नाही. 

Web Title: Ghulam Nabi Azad: Jammu kashmir: wave of resignations in support of Ghulam Nabi Azad, 6 former MLA left congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.