नवी दिल्ली :काँग्रेसचे माजी नेते गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azad) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचे कौतुक केले आहे. यासोबतच त्यांनी काँग्रेस (Congress) नेतृत्वावरही निशाणा साधला आहे. आझाद यांनी पंतप्रधान मोदींचे अतिशय उदारमतवादी असे वर्णन केले. ते म्हणाले की, विरोधी पक्षनेता म्हणून मी त्यांच्यावर खूप टीका केली. कलम 370 असो किंवा नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) असो, प्रत्येक मुद्द्यावर त्यांना घेरले गेले. पण पंतप्रधान मोदी नेहमीच एका सुसंस्कृत राजकारण्यासारखे वागले आणि त्यांनी कधीही बदला घेतला नाही.
काँग्रेसवर निशाणाएएनआय (ANI) या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी काँग्रेसच्या सद्यस्थितीवरही भाष्य केले. 'जवाहरलाल नेहरू, राजीव गांधी आणि इंदिरा गांधी हे आघात सहन करू शकले असते, त्यांच्याकडे तेवढी क्षमता होती. त्यांना जनतेचा पाठिंबा होता आणि त्यांचा आदर होता. सध्याच्या काँग्रेस नेतृत्वाचा (Rahul Gandhi) जनतेवर कोणताही प्रभाव नाही. काँग्रेस नेतृत्वाशी माझे काही मतभेद असतील, पण काँग्रेस पक्ष आणि त्याच्या विचारसरणीबाबत मला कोणतीही अडचण नाही.
आझादांचे आत्मचरित्रनेहरू, इंदिरा आणि राजीव यांच्या काळात काय चूक झाली हे आपल्या पुस्तकात लिहिले आहे, असेही आझाद यांनी सांगितले. गुलाम नबी आझाद यांचे आत्मचरित्र उद्या म्हणजेच 5 एप्रिल रोजी रिलीज होणार आहे. दिल्लीतील एका कार्यक्रमात काँग्रेस नेते डॉ. करण सिंह त्याचे प्रकाशन करतील. यावेळी आझाद यांनी त्यांना आणि G23 ला भाजपचा पाठिंबा असल्याचा आरोपही फेटाळून लावला. ते म्हणाले की, हा निव्वळ मूर्खपणा आहे. जी 23 भाजपच्या जवळ असती तर तेथील लोकांना खासदार का केले असते? फक्त मी बाहेर पडून पक्ष काढला. बाकीचे नेते तिथेच आहेत.