ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १९ - दक्षिण दिल्लीतील उपहार चित्रपटगृहात १९९७ साली झालेल्या अग्नीकांडप्रकरणी सुप्रीम कोर्टाने या चित्रपटगृहाचे मालक अन्सल बंधूंची जेलपासून सुटका केली आहे, मात्र त्यांना याप्रकरणी ६० कोटींचा दंड भरण्याचा आदेश दिला आहे.
उपहार चित्रपटगृहाचे मालक गोपाळ अन्सल आणि सुशिल अन्सल या बंधूंनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने त्यांची जेलपासून सुटका करण्याचा निर्णय घेतला. मात्र, याप्रकरणी त्यांना येत्या तीन महिन्यात दिल्ली सरकारकडे ६० कोटी रुपयांचा दंड भरण्याचा आदेश दिला आहे.
उपहार चित्रपटगृहाला ३ जून १९९७ साली आग लागली होती. या आगीत ५९ जणांचा मृत्यू झाला होता, तर १०० जण जखमी झाले होते.