अलीगढ : वाद उत्पन्न झाल्यानंतर अलीगढ मुस्लीम विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेच्या कार्यालयातील पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जीन्ना यांचे तैलचित्र जागेवर नसल्याचे बुधवारी आढळून आले.त्यानंतरही हिंदू युवा वाहिनीने विद्यापीठात घुसून निदर्शने करण्याचा प्रयत्न केला. त्यांना दुसऱ्या संघटनेच्या विद्यार्थ्यांनी विरोध केला. त्यावेळी पोलिसांनी लाठीमार, अश्रुधूर व गोळीबाराचा वापबर केला. त्यात दोन विद्यार्थी जखमी झाले.विद्यापी़ठ प्रशासनाने खुलासा केला की, धूळ साचल्याने सर्वच तसबिरी साफसफाइसाठी काढल्या. माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्या कार्यक्रमाच्या आधी त्या पुन्हा लावणार का, असे विचारता प्रशासनाने सांगितले की, कोणतीही तसबीर काढलेली नाही. भारत लोकशाहीवादी देश आहे व विद्यापीठ धर्मनिरपेक्षते धोरणाचे पालन करते.अलीगढचे भाजपाचे लोकसभा सदस्य सतीश गौतम यांनी जीन्नांच्या तैलचित्रास आक्षेप घेतला होता. हिंदू युवा वाहिनीनेह विद्यापीठाने ४८ तासांत जीन्नांचे चित्र हटविले नाही तर आम्ही ते काढू, असा इशारा दिला होता. (वृत्तसंस्था)मुळात जीन्नांचे तैलचित्र लावण्यामागचे कारण स्पष्ट करताना विद्यापीठाचे प्रवक्ते शैफी किडवई यांनी सांगितले होते की, राजकारण, सामाजिक सेवा आणि शिक्षण या क्षेत्रातील थोर व्यक्तींना मानद आजीव सदस्यत्व देण्याची विद्यापीठाची फार जुनी परंपरा आहे. अशा व्यक्तींची चित्रे त्या त्या प्रसंगी लावली गेली आहेत. जीन्ना हे विद्यापीठाचे संस्थापक सदस्य व देणगीदार आहेत. विद्यार्थी संघटनेने स्वतंत्र पाकिस्तानची मागणी पुढे येण्याच्या आधी म्हणजे १९३९ मध्येच त्यांना आजीव सदस्यत्व दिले होते.
विद्यापीठातून जीन्नांचे तैलचित्र काढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2018 4:52 AM