शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
4
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
5
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
6
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
7
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
8
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
9
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
10
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
11
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
12
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
13
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
14
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
15
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
16
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
17
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
18
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
19
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
20
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात

बिपरजॉय वादळाचा धोका; गिर जंगलातील 100 सिंहाना सुरक्षित स्थळी हलवले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2023 3:17 PM

gir lion biporjoy cyclone: बिपरजॉय वादळाचा प्रभाव गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळमध्ये दिसायला लागला आहे.

gir lion biporjoy cyclone: अरबी समुद्रात निर्माण झालेले 'बिपरजॉय चक्रीवादळ' वेगाने भारतीय किनारपट्टीच्या दिशेने सरकत आहे. या वादळाचा प्रभाव गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळमध्ये दिसायला लागला आहे. समुद्रात उंचच्या उंच लाटा उसळत आहेत. धोका पाहता तिन्ही राज्य सरकारे अलर्ट मोडवर आहेत. दरम्यान, आशियाई सिंहांसाठी प्रसिद्ध असलेल्या गिर जंगलावर या वादळाचा परिणाम दिसून येत असून, 100 सिंहांना सुरक्षित स्थळी नेण्यात आले आहे.

गिर सफारी बंद300 ट्रॅकर्सच्या माध्यमातून सिंहांच्या हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे. ट्रॅकर्सच्या मदतीने सिंहांना होणारा संभाव्य धोका आधीच ओळखता येतो. त्यामुळे वेळीच सिंहांचे प्राण वाचू शकतात. वादळामुळे 70 ते 80 किमी वेगाने वारे वाहू शकतात. कोणत्याही वन्यप्राण्यांना इजा होऊ नये यासाठी वनविभाग ठोस व्यवस्था करत आहे.

आराधना साहू(CCF जुनागड) यांनी सांगितले की, बिपरजॉय चक्रीवादळाच्या विनाशकारी प्रभावामुळे गिर जंगल सफारी आणि देवलिया पार्क 12 ते 16 जूनपर्यंत बंद ठेवण्यात आले आहेत. गीर सफारीमध्ये 16 जूनपासून 4 महिन्यांची पावसाळी सुट्टी सुरू होत आहे. आता गिर सफारी 16 ऑक्टोबरलाच सुरू होईल.

यापूर्वी वादळात मोठे नुकसान झाले होतेधोका लक्षात घेता वादळाच्या काळात कोणालाही गीर जंगलात जाऊ देऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे. हे वादळ संपताच देवलिया पार्क सुरू करण्यात येईल. गीरच्या जंगलात आलेल्या वादळामुळे अनेक झाडे उन्मळून पडली होती. अशा स्थितीत प्रशासन यावेळी आधीच सतर्क झाले आहे. धोका ओळखून गीर सफारी आधीच बंद करण्यात आली आहे.

टॅग्स :Gujaratगुजरातcycloneचक्रीवादळMaharashtraमहाराष्ट्रgoaगोवाKeralaकेरळ