Rahul Gandhi Ed Raid Claim : काँग्रेसचे खासदार आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आज (2 ऑगस्ट) दावा केला आहे की, लोकसभेतील त्यांच्या भाषणानंतर अंमलबजावणी संचालनालयाने (ED) त्यांच्या घरावर छापा टाकण्याची तयारी केली आहे. आता राहुल यांच्या या दाव्यामुळे केंद्रीय मंत्री आणि भाजपचे फायरब्रँड नेते गिरिराज सिंह (Giriraj Singh) चांगलेच संतापले आणि राहुल यांना ओपन चॅलेंज दिले.
काय म्हणाले गिरिराज सिंह ?राहुल यांच्या दाव्यावर गिरिराज सिंह म्हणतात, "राहुल गांधी विरोधी पक्षनेते आहेत, हे देशाचे दुर्दैव आहे. ते फक्त संसदेत खोटं बोलत नाहीत, तर बाहेरही बोलतात. मी त्यांना आव्हान देतो की, कोणत्या अधिकाऱ्याने त्यांना फोन केला, हे त्यांनी सांगावे. लोकांना त्यांच्या जातीबद्दल विचारतात आणि स्वतःची जात लपवून ठेवतात. त्यांना स्वतःचीच लाज वाटतली पाहिजे. एका संविधानिक पदावर बसून लोकांमध्ये चुकीची माहिती पसरवण्याचे काम करत आहेत," अशी टीका त्यांनी केली.
राहुल गांधींनी काय दावा केला आहे?राहुल गांधी यांनी शुक्रवारी X वरील एका पोस्टमध्ये दावा केला की, "टू इन वनला माझे चक्रव्यूह भाषण आवडले नाही. त्यामुळे माझ्यावर ED ची धाड टाकण्याची योजना आखली जात आहे. ईडीतील काही लोकांनी मला ही माहिती दिली. मी ईडीची वाट पाहत आहे, हात पसरून त्यांचे स्वागत करेल. चहा, बिस्कीट माझ्याकडून त्यांना मिळेल", असे राहुल यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.