शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

'कुराणवर कुणी काही बोलत नाही, कारण...', रामचरितमानसवरील टीकेवर केंद्रीय मंत्र्यांचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2023 4:45 PM

केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी बिहारचे मुख्मंत्री आणि शिक्षण मंत्र्यांवर जोरदार टीका केली.

Giriraj Singh On Ramcharit Manas Remarks Row: भगवान श्रीराम आमि रामचरितमानसवर बिहारचे मंत्री चंद्रशेखर यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा प्रचंड विरोध होत आहे. या वक्तव्यावर केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी प्रत्युत्तर दिले आहे. गिरीराज सिंह यांनी रविवारी (22 जानेवारी) पाटणा येथे बोलताना म्हटले की, "जसा भगवद्गीता हा हिंदूंचा पवित्र ग्रंथ आहे, त्याचप्रमाणे कुराण हा मुस्लिमांचा पवित्र ग्रंथ आहे. कुराणबद्दल कोणी काहीही बोलत नाही, कारण 'सर तन से जुदा' केले जाते. हिंदूंच्या पवित्र ग्रंथाविरुद्ध बोलण्याची आजच्या काळात फॅशन झाली आहे,'' अशी टीका त्यांनी केली.

बिहारचे शिक्षण मंत्री चंद्रशेखर यांनी अलीकडेच म्हटले होते की, "तुलसीदासांच्या रामचरितमानसने सामाजिक भेदभाव आणि समाजात द्वेष पसरवण्याला प्रोत्साहन दिले. रामचरितमानसला विरोध झाला कारण त्यात, म्हटले होते की समाजातील खालचा वर्ग शिक्षित झाल्यावर विषारी होतो. रामचरितमानस, मनुस्मृती आणि एम.एस. गोळवलकरांच्या बंच ऑफ थॉट्स सारख्या पुस्तकांनी सामाजिक विभाजन निर्माण केले," असे विधान त्यांनी केल होते.

गुलाम रसूल यांच्या वक्तव्यावरही प्रत्युत्तर दिलेयापूर्वी गिरीराज सिंह यांनी जेडीयू आमदार गुलाम रसूल बलियावी यांच्या वक्तव्यावरही जोरदार हल्ला चढवला होता. गुलाम रसूल म्हणाले होते की, ''जर पैगंबर मुहम्मद यांच्याकडे कोणी बोट उचलले तर मुस्लिम प्रत्येक शहरात मोठा विरोध दर्शवतील. मुस्लिम अजिबात संकोच करणार नाहीत, कारण मुस्लिमांचे जीवन आणि श्वास फक्त पैगंबरांसाठी आहे.''

नितीशकुमारांवर निशाणा साधला

गिरीराज सिंह यांनी जेडीयू नेत्यावर अशी विधाने करून देशातील जातीय सलोखा बिघडवल्याचा आरोप केला. ते म्हणाले, "तुकडे तुकडे टोळीचे नेते रामायणाचा अपमान करुन हिंदूंचा अपमान करतात, पण कुराणावर भाष्य करण्याची हिंमत त्यांच्यात नाही. नितीशकुमार हे लाचार मुख्यमंत्री आहेत, ते धृतराष्ट्रासारखे फक्त पाहत आहेत," अशी टीका त्यांनी केली.

टॅग्स :ramayanरामायणCentral Governmentकेंद्र सरकारBiharबिहारBJPभाजपाNitish Kumarनितीश कुमार