नवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाचे नेते आणि केंद्रीयमंत्री गिरीराज सिंह यांनी राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांच्या बेरोजगारी हटाव यात्रेवर खोचक टीका केली आहे. त्यांनी या यात्रेला उद्देशून तेजस्वी यादव यांच्या बेरोजगारीवर बोट ठेवले आहे.
ज्या लोकांकडे स्वत:साठी रोजगार नाही तेच लोक 'बेरोजगारी हटाव' यात्रा काढत असल्याचे गिरीराज सिंह म्हणाले. पटना येथे आयोजित पत्रकार परिषदेते ते बोलत होते. बेरोजगारी हटाव यात्रा काढणारे लोक कोण विरोधी पक्षाचे नेते आहे. त्यांच्याकडे काहीही काम उरले नसल्याचे त्यांनी सांगितले. बिहारमध्ये 15 वर्षे सत्तेचा उपभोग घेणाऱ्यांनी रोजगारासाठी काहीही केले नाही. बेरोजगारीमुळे लोकांना बिहार सोडून जावं लागल्याचे गिरीराज सिंह यांनी म्हटले.
बिहारमध्ये जे रोजगार देऊ शकत होते, त्यांना व्यापार करू दिला नाही.जनतेला सर्वकाही ठावूक आहे. बेराजगारी यात्रा काढल्याने काहीही फरक पडणार नाही. यावेळी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत विरोधकांना नाकारण्याचे जनतेने आधीच ठरवून घेतले आहे. विरोधक आताही बेरोजगार असून निवडणुकीनंतर देखील बेरोजगारच राहणार असल्याचे गिरीराज सिंह यांनी नमूद केले.
तेजस्वी यादव एनआरसी, सीएए आणि एनपीआरसह बेरोजगारीच्या मुद्दावर यात्रा काढत आङे. येत्या 23 फेब्रुवारी पासून त्यांची यात्रा सुरू होणार आहे. या यात्रेसाठी हायटेक गाडी बनविण्यात आली आहे