शहराच्या विकासात लक्ष घालणार गिरीश महाजन : महापौरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांना आश्वासन
By admin | Published: March 14, 2016 12:21 AM
जळगाव: शहर विकासासाठी निधी उपलब्ध करून द्या. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेला २५ कोटीचा निधी मिळवून द्या, या मागणीसाठी महापौर नितीन ला, उपमहापौर ललित कोल्हे यांच्यासह सर्वपक्षीय नगरसेवकांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची रविवारी सायंकाळी अजिंठा विश्रामगृहावर भेट घेऊन साकडे घातले. यावेळी भाजपाचा आमदार व खासदार निवडून देणार्या या शहराच्या विकासासाठी स्वत: लक्ष घालणार असल्याची ग्वाही महाजन यांनी दिली.
जळगाव: शहर विकासासाठी निधी उपलब्ध करून द्या. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेला २५ कोटीचा निधी मिळवून द्या, या मागणीसाठी महापौर नितीन ला, उपमहापौर ललित कोल्हे यांच्यासह सर्वपक्षीय नगरसेवकांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची रविवारी सायंकाळी अजिंठा विश्रामगृहावर भेट घेऊन साकडे घातले. यावेळी भाजपाचा आमदार व खासदार निवडून देणार्या या शहराच्या विकासासाठी स्वत: लक्ष घालणार असल्याची ग्वाही महाजन यांनी दिली. तसेच सर्वपक्षीय नगरसेवकांची मुख्यमंत्री व अर्थमंत्र्यांशी भेट घडवून आणण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. पालकमंत्री एकनाथराव खडसे हे देखील शहर विकासाठी सकारात्मक असून निधी मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे महाजन यांनी सांगितले.मुख्यमंत्र्यांनी जळगाव दौर्यात शहर विकासासाठी मनपाला २५ कोटीचा निधी देण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार मनपाने ठराव करून कामांचा प्रस्ताव जिल्हाधिकार्यांच्या प्रशासकीय मान्यतेसह शासनाला पाठविला आहे. मात्र वर्षभराचा कालावधी उलटत येऊनही हा निधी मनपाला मिळालेला नाही. मनपाची आर्थिक स्थिती बिकट आहे. त्यामुळे शहरात विकासासाठी निधीची आवश्यकता आहे. त्यासंदर्भात महापौर नितीन ला, उपमहापौर ललित कोल्हे, माजी उपमहापौर सुनील महाजन, स्थायी समिती सभापती नितीन बरडे, नगरसेवक श्यामकांत सोनवणे तसेच भाजपाचे गटनेते डॉ.अश्विन सोनवणे, विजय गेही, राष्ट्रवादीचे गटनेते सुरेश सोनवणे, विनोद देशमुख,अमरजैन, मनोजकाळे, खाविआचे चेतन शिरसाळे, अजय पाटील, संजय कोल्हे, शैलेंद्र इंगळे आदींनी रविवारी सायंकाळी विश्रामगृहावर गिरीश महाजन यांची भेट घेऊन शहरातील विकास कामांबाबत चर्चा केली. महाजन यांनी निधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. ---- इन्फो------मुख्यमंत्री, अर्थमंत्र्यांशी नगरसेवकांची भेट घडविणारजलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी २५ कोटीच्या निधीसाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात येणार आहे. मुख्यमंत्र्यांनी त्याबाबत आधीच आश्वासन दिले असल्याचे या शिष्टमंडळाला सांगितले. तसेच सर्वपक्षीय नगरसेवकांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी तसेच अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी भेट घडवून आणणार असल्याचे सांगितले. ---- इन्फो------शहरातील नागरिकांवर अन्याय होऊ देणार नाहीसर्वपक्षीय नगरसेवकांनी महाजन यांना शहराकडे लक्ष द्या, अशी विनंती केली. त्यावर महाजन यांनी शिष्टमंडळाला सांगितले की, राज्य शासनाचा एक भाग म्हणून मी शहरातील नागरिकांवर अन्याय होऊ देणार नाही. शहराने भाजपाचा आमदार व खासदारही निवडून दिला आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना प्राथमिक सुख सुविधा उपलब्ध करून देणे कर्तव्य आहे. शहर विकासासाठी आपण स्वत: लक्ष घालू, असे आश्वासन त्यांनी यावेळी शिष्टमंडळाला दिले.--- इन्फो----नूतन महापौरांचा सत्कारयावेळी जलसंपदा मंत्री महाजन यांच्या हस्ते नूतन महापौर नितीन ला, उपमहापौर ललित कोल्हे यांचा सत्कार करण्यात आला.