शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रि‍पदाचा चेहरा असू शकतात का? शरद पवार म्हणाले...
2
मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचे जशास तसे प्रत्युत्तर; वडीगोद्री येथे उपोषण सुरु करणार!
3
IND vs BAN: फुकटात पाहता येणार भारत-बांग्लादेश पहिली कसोटी, पण कुठे? वाचा सविस्तर
4
पाण्यासाठी पाकिस्तान तरसणार, भारताने पाठविली नोटीस; सिंधू वाटप करार बदलणार
5
'एक देश एक निवडणूक' संविधानविरोधी; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर हल्लाबोल
6
छोट्या बहिणीसमोर ९ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, गप्प राहण्यासाठी दिले 20 रुपये
7
"तेव्हा विराटने १,०९३ वेळा भगवान शंकराचा जप केला"; गंभीरने सांगितला 'तो' खास किस्सा
8
हृदयद्रावक! CAF जवानाकडून साथीदारांवर अंदाधुंद गोळीबार; दोघांचा मृत्यू, कारण अस्पष्ट
9
पोलीस अधिकाऱ्यानं वकिलाला मारली लाथ, कोर्टानं ठोठावला तीन लाख रुपयांचा दंड!
10
“राहुल गांधींना धमक्या देणाऱ्यांवर कठोर कारवाई करा”; काँग्रेस करणार राज्यभर आंदोलन
11
खेकड्यांनी पोखरलं होतं धरण, उंदरांनी दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे; गाड्या हवेत उडू लागल्या
12
“...तरच मी माझे शब्द मागे घेईन”; संजय गायकवाड यांनी राहुल गांधींसमोर ठेवली मोठी अट
13
ICU मध्ये चप्पल घालू नका सांगितल्यामुळे डॉक्टरला बेदम मारहाण; व्हिडिओ व्हायरल...
14
आतिशी २१ सप्टेंबरला घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ, उपराज्यपालांकडून सरकार स्थापनेचं निमंत्रण
15
SL vs NZ : WHAT A TALENT! शतकांची मालिका सुरुच; श्रीलंकेच्या खेळाडूसमोर सगळ्यांचीच 'कसोटी'
16
"सर्वात भयंकर म्हणजे पंतप्रधान-गृहमंत्र्यांनी याला भडकावणे", प्रियंका गांधी का संतापल्या?
17
"बाळासाहेब असते, तर तुम्हाला उलटे टांगले असते", बोरनारेंचा उद्धव ठाकरेंवर वार
18
अयोध्येतील राम मंदिरावर आतापर्यंत २५०० कोटींचा खर्च; सरकारला मिळणार इतक्या कोटींचा GST!
19
५०० रुपयांत गॅस सिलिंडर, मोफत उपचार... हरियाणा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून जाहीरनामा प्रसिद्ध, कोणासाठी काय-काय?
20
जगातील अनेक देशांमध्ये 'वन नेशन वन इलेक्शन'चा फॉर्म्युला लागू, अशी आहे प्रक्रिया...

लखनौ विद्यापीठात IPS अधिकाऱ्याच्या मुलीचा संशयास्पद मृत्यू; रूममध्ये सापडला मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Published: September 01, 2024 7:24 PM

रूममध्ये संशयास्पद स्थितीत मुलगी बेशुद्धावस्थेत आढळून आली. ती एलएलबीच्या तिसऱ्या वर्षाची विद्यार्थिनी होती. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. 

लखनौच्या राम मनोहर लोहिया नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीच्या वसतिगृहात अनिका रस्तोगी या १९ वर्षीय विद्यार्थिनीचा मृतदेह सापडला आहे. रूममध्ये संशयास्पद स्थितीत मुलगी बेशुद्धावस्थेत आढळून आली. ती एलएलबीच्या तिसऱ्या वर्षाची विद्यार्थिनी होती. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. 

अनिका ही IPS संतोष रस्तोगी यांची मुलगी होती, जी सध्या दिल्लीतील एनआयए (नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी) मध्ये IG म्हणून कार्यरत आहेत. अनिका रात्री तिच्या खोलीत गेली होती, त्यानंतर तिने दरवाजा उघडला नाही. ती न दिसल्यामुळे मित्रांनी दरवाजा तोडला असता अनिका बेशुद्ध अवस्थेत आढळली.

मित्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिकाला लगेचच रुग्णालयात नेण्यात आलं, तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. मृत्यूचं कारण अद्याप स्पष्ट झालं नसल्याचं पोलिसांनी सांगितलं. पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला असून, पोस्टमार्टम रिपोर्टमध्येच मृत्यूचं कारण स्पष्ट होणार आहे.

या संशयास्पद मृत्यूमुळे विद्यापीठ आणि पोलीस प्रशासनात चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत असून अनिकाच्या कुटुंबीयांना या घटनेची माहिती देण्यात आली आहे. या घटनेने विद्यापीठातील विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांना धक्का बसला आहे.

अनिकाच्या मृत्यूचे खरं कारण जाणून घेण्यासाठी सर्वजण पोस्टमार्टम रिपोर्टची वाट पाहत आहेत. जे काही सत्य समोर येईल त्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल, असं पोलीस अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.