मध्य प्रदेशात हात नसलेल्या मुलीचा जन्म; वडील म्हणाले- देवाने जे दिले त्यात आनंदी...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2022 03:30 PM2022-12-06T15:30:20+5:302022-12-06T15:31:21+5:30
ही चिमुकली सध्या परिसरात चर्चेचा विषय बनली आहे. अनेक लोक या चिमुकलीला पाहायला येत आहेत.
बरवानी: मध्य प्रदेशातील बरवानी जिल्ह्यात एका हात नसलेल्या अनोख्या मुलीचा जन्म झाला आहे. अशाप्रकारची केस लाखात एक असते, असे डॉक्टर सांगतात. ही नवजात पूर्णपणे निरोगी असून, तिचे वजन 2 किलो 800 ग्रॅम आहे. प्रसूतीच्या वेळी अनुवांशिकतेमुळे किंवा संसर्गामुळे असे मूल जन्माला आले असावे, असा डॉक्टरांचा अंदाज आहे.
मुलीच्या जन्माने कुटुंबीय आनंदी
विशेष म्हणजे, मुलीच्या जन्मामुळे घरातील सदस्य खूप आनंदात आहेत. ते म्हणाले की, देवाने आपल्याला जे काही दिले आहे त्यात आपण आनंदी आहोत. ही चिमुकली सध्या परिसरात चर्चेचा विषय बनली आहे. अनेक लोक या हा नसलेल्या चिमुकलीला पाहायला येत आहेत. मुलीचे वडील नितेश यांनी सांगितले की, अनेक लोक फोन करून मुलीबद्दल विचारत आहेत.
नितेश यांनी सांगितले की, 1 डिसेंबर रोजी त्यांच्या पत्नीची सामान्य प्रसूती झाली. मुलगी जन्माला आली तेव्हा तिला हात नसल्याचे आढळून आले. पण आम्हाला याची पर्वा नाही. आमची मुलगी आमच्यासाठी लक्ष्मी मातेचे रूप आहे. देवाने मुलीला जे काही बनवले आहे, त्यातच आनंदी असल्याचे नितेशने सांगितले.
दोन डोके आणि तीन हात असलेले बाळ
यापूर्वी रतलाममध्ये एका अनोख्या मुलाचा जन्म झाला होता. जावरा येथे राहणाऱ्या शाहीनने अनोख्या मुलाला जन्म दिला. या मुलाला दोन डोकी आणि तीन हात आहेत. तिसरा हात दोन चेहऱ्यांमधला पाठीमागे आहे. हे मूल सोनोग्राफीत जुळे दिसत होते. मात्र प्रसूती झाली तेव्हा त्याला दोन डोकी असल्याचे आढळून आले.