शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेची पहिली यादी आज? अमित ठाकरे, नांदगावकर, देशपांडे, जाधव यांची नावे निश्चित?
2
आजचे राशीभविष्य: स्त्रियांशी काळजी पूर्वक व्यवहार करावेत, पैसा आणि कीर्ती यांची हानी संभवते
3
उमेदवार यादीआधीच १७ जणांना एबी फॉर्म; अजित पवार गट उद्या जाहीर करणार यादी
4
बहिणीसाठी धारावीच्या जागेचा गायकवाडांचा आग्रह; नेत्यांचे म्हणणे- कार्यकर्त्यांना उमेदवारी द्या!
5
मनसेला महायुतीचा पाठिंबा मिळण्याची चर्चा; मतांचे विभाजन होऊ नये यासाठी सारेच प्रयत्नशील
6
फडणवीस-ठाकरे कथित भेटीच्या चर्चेचा धुरळा; काँग्रेस-उद्धवसेना म्हणते, यात तथ्य नाही!
7
११ आमदारांचे मताधिक्य ‘नोटा’पेक्षाही होते कमी; २०१९ विधानसभा निवडणुकीत काय घडलं होतं?
8
जागावाटप अन् नाराजीनाट्याचा पहिला अंक! महायुतीत धुसफुस, महाविकास आघाडीत दिलजमाई
9
भाजपाने नाकारले; संदीप नाईक यांच्या हाती तुतारी; वाशीत आज शरद पवार गटात जाहीर प्रवेश?
10
LAC वर गस्त घालणार, भारत-चीनमध्ये करार; मोदी-जिनपिंग यांच्यात चर्चा होण्याची शक्यता
11
महायुतीतर्फे मुंबईत सात, तर मविआ देणार तीन महिला; शरद पवार गटातून कुणीही नाही?
12
जिल्ह्यातील ओबीसी नेता अशा ओळखीमुळे किसन कथोरे यांना पुन्हा संधी; सूत्रांची माहिती
13
आमदार व्हायचंय? भरा अर्ज, आज उघडणार दालनाचे द्वार! २९ ऑक्टोबरपर्यंत निवडणुकीची प्रक्रिया
14
कल्याण पूर्व विधानसभा: भाजपच्या सुलभा गायकवाड यांना शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा विरोध
15
पुणे बंगळुरू हायवेवर खासगी वाहनात सापडली कोट्यवधीची रोकड; सत्ताधारी आमदाराकडे बोट?
16
आमदार चंद्रकांत पाटलांचा CM एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश
17
मविआच्या जागावाटपाची तारीख ठरली! काँग्रेसच्या बैठकीनंतर चेन्निथलांनी दिली महत्त्वाची माहिती
18
प्रेयसीची ‘दृश्यम स्टाईल’नं हत्या, मृतदेह पुरून केलं फ्लोअरिंग; आरोपीला अटक
19
भारत-कॅनडा वादावर जयशंकर यांनी मौन सोडले, उच्चायुक्तांना परत बोलवण्याचे कारण सांगितले
20
विले पार्लेत महायुतीची डोकेदुखी वाढली! शिवसेना नेते दीपक सावंत लढणार अपक्ष

मुलाला सोडण्यासाठी घरचे गेले स्टेशनवर; अन् संधीचा फायदा घेत मुलगी प्रियकरासोबत गेली पळून

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2023 1:10 PM

बिहारमधील जमुई जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

नवी दिल्ली : बिहारमधील जमुई जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे मलयपूर पोलीस स्टेशन हद्दीतील केरीबाग टोला येथील एका कुटुंबातील सदस्य आपल्या मुलाला स्टेशनवर सोडण्यासाठी गेले असता मुलीने धक्कादायक कृत्य केले. दरम्यान, संधी मिळताच त्यांची मुलगी प्रियकरासह पळून गेली. याप्रकरणी बेपत्ता मुलीच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात अर्ज दाखल केला आहे.

संबंधित मुलीच्या वडिलांनी दाखल केलेल्या अर्जात म्हटले, माझा मुलगा ८ जानेवारीला निघाला होता आणि आम्ही त्याला सोडण्यासाठी मलयपूर रेल्वे स्टेशनवर गेलो होतो. संध्याकाळी 7 वाजता आमच्या मुलाला बलिया-सियालदह एक्स्प्रेसमध्ये बसवून आम्ही घरी परतलो तेव्हा आम्हाला आमची मुलगी घरातून बेपत्ता असल्याचे दिसले. आम्ही तिचा खूप शोध घेतला, पण ती काही सापडली नाही.

प्रियकराच्या घरच्यांविरूद्ध FIR दाखल वडिलांनी सांगितले की, अधिक चौकशी केल्यावर कळले की, माझ्याच गावातील कार्तिक मांझी यांचा मुलगा सूरज मांझी याने माझ्या मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले. दोघांचे प्रेमप्रकरण अनेक दिवसांपासून सुरू असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. यानंतर ती तिच्या प्रियकरासह पळून गेल्याचे उघड झाले. बेपत्ता मुलीच्या वडिलांनी या प्रकरणात कार्तिक मांझी, त्यांची पत्नी सुमा देवी, बटू मांझी आणि इतरांवर लग्नाच्या उद्देशाने आपल्या मुलीचे अपहरण केल्याचा आरोप करत एफआयआर दाखल केला आहे. मलयपूर पोलीस ठाण्याचे प्रमुख वीरभद्र सिंग यांनी सांगितले की, अर्जाच्या प्राथमिक माहितीवरून एफआयआर नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाची अधिक चौकशी करण्यात येत आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

टॅग्स :BiharबिहारCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसmarriageलग्न