इंदूर : ‘‘ती युवती भय्यू महाराजांकडे काम करण्यासाठी आली होती. हळूहळू घरात वर्चस्व गाजवू लागली. भय्यू महाराजांच्या बेडरुममध्ये थांबत होती. त्यांच्या कपाटात कपडे ठेवत होती. बाथरुममध्ये स्रान करत होती. विनायक आणि शेखर हेही तिच्याशी मिळालेले होते. सर्वांनी कट करुन भय्यू महाराजांना जाळ्यात फसविले आणि ब्लॅकमेल करु लागले’’असा खुलासा भय्यू महाराज (उदयसिंह देशमुख) यांच्या आई ७५ वर्षीय कुमुदनी देशमुख यांनी केला आहे.भय्यू महाराजांच्या मृत्यूनंतर सहा महिन्यांनी प्रथमच त्यांच्या आईने मौन सोडले आहे. चालक कैलाश पाटील उर्फ भाऊने केलेल्या सर्व आरोपांना त्यांनी दुजोरा दिला आहे. सद्या कुमुदनी यांची प्रकृती खराब आहे. त्या बेडवरुन उठूही शकत नाहीत. आपल्या मुलाची आठवणक काढून सतत रडत असतात.महाराजांच्या आई कुमुदनी म्हणाल्या की, मला माहित आहे की, शेखर आणि विनायक भय्यू महाराजांना एकटे पाहून त्या मुलीला हे दोघे फोन करत होते. भय्यूजी महाराज भलेही स्रान करत असोत, तरीही जबरदस्तीने त्यांच्या कानाला फोन लावत असत. कुमुदनी यांनी पोलीस अधिकाऱ्यांशी फोनवर चर्चा करुन हीच बाब सांगितली आहे.वरिष्ठ पोलीस अधिकारी अगम जैन यांनी सांगितले की, लवकरच कुमुदनी, आयुषी आणि कुहू यांचे जबाब घेण्यात येतील.शेखरचा महाराजांवर दबावआई कुमुदनी यांनी आरोप केला आहे की, भय्यू महाराजांना त्या तरुणीने मारले आहे. आश्रमात काम मागायला ती आली होती. हळूहळू घरात वर्चस्व निर्माण केले. एकटी तीच नव्हे, तर विनायक, शेखरही या कटात सहभागी होते. विनायक नाली साफ करायचा. त्याचे वडील काशिनाथ आश्रमात सेवा करायचे. काशीने मुलाची भेट करुन दिली आणि भय्यू महाराजांकडे नोकरीला ठेवले. त्याने जाळे टाकले आणि भय्यू महाराजांना मुठीत घेतले. शेखर तर महाराजांवर दबाव टाकून असायचा. एकदा भय्यू महाराज पूजेसाठी जात होते. त्याने तरुणीचा उल्लेख केला आणि सांगितले की, महाराज तर तिच्यासोबत फिरायला गेले आहेत. तेव्हा मी त्याला खूप फटकारले होते. त्याने मला उलटून उत्तर दिले होते.विनायकसोबत ‘तिचे’ आक्षेपार्ह फोटोमहाराजांना ब्लॅकमेल करणारी तरुणी आणि सेवेकरी विनायक यांचे आक्षेपार्ह फोटो समोर आले आहेत. विनायक आतापर्यंत त्या तरुणीला आपली बहीण आणि महाराजांच्या मुलीसारखी असल्याचे सांगत होता. पोलिसांनी लाखो रुपयांचे बिलही जप्त केले आहेत. या वस्तू महाराजांना धमकावून खरेदी केल्या जात होत्या. या चौकशीनंतर आता सेवेकरी विनायक दुधाळे आणि ब्लॅकमेल करणारी तरुणी यांच्या समस्या वाढल्या आहेत. रविवारी या तरुणीने चौकशीत सांगितले होते की, महाराजांची मुलगी कुहूची आपण केअरटेकर होतो. महाराज आपणास मुलगी मानत होते. त्यांच्या कुटुंबियांना आमची जवळीक आवडली नाही आणि अनैतिक संबंधांचे आरोप करणे सुरु केले. विनायकने म्हटले आहे की, तरुणी खरे सांगत आहे. ती महाराजांना ब्लॅकमेल करत नव्हती. ती तर आपल्याला बहिणीसमान आहे. सोमवारी पोलिसांनी तरुणी आणि विनायकचा खोटारडेपणा समोर आणला. पोलिसांना असे फोटो मिळाले आहेत ज्यात तरुणी विनायकसोबत आक्षेपार्ह स्थितीत आहे. महाराजांच्या मोबाइलमध्ये भुरु, कुकु आणि अन्य नावांनी नंबर सेव्ह आहेत. महाराज तिला प्रेमाने वेगवेगळ्या नावाने हाक मारत. महाराज आणि तरुणीमधील आक्षेपार्ह चॅटिंगही मोबाइलमध्ये मिळाली आहे. पोलिसांनी सूट, ज्वेलरी, मोबाइल आणि फ्लाइटचे लाखो रुपयांचे बिल ताब्यात घेतले आहेत. अधिकाºयांचा असा दावा आहे की, तरुणीने महाराजांवर दबाव आणून महागड्या वस्तू खरेदी केल्या होत्या.सचिवावर संशय : पोलिसांनी ट्रस्टचे सचिव तुषार पाटीलची चौकशी केली आहे. त्याच्यावरही सत्य लपविल्याचा संशय आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार तुषार संशयित विनायक, शेखर आणि शरद यांच्या संपर्कात आहे. जबाबानंतर तिघे आश्रमात जात होते. ज्यांच्यावर या कटात सहभागी असल्याचा आरोप आहे त्यांच्याशी तुषारचे भेटणे संशय निर्माण करतो. महाराजांचे विश्वसनीय संजय यादव, संदीप काटे यांच्याशीही पोलीस चर्चा करत आहेत. पुणेस्थित आश्रमाचे कामकाज पाहणाºया अमोल चव्हाण याचीही पोलिसांनी चौकशी केली. महाराजांच्या गोपनीय नंबरमध्ये अमोलचा नंबर होता. तो ११ जून रोजी दिवसा आणि रात्री सतत बोलत होता. महाराजांशी संबंधित अनूप राजोलकरलाही बोलविण्यात आले आहे.तरुणीसोबत गुजरातमध्ये गेला होता कॉन्ट्रॅक्टरमहाराजांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांच्या वादग्रस्त जमीन खरेदी - विक्रीत सहभागी कॉन्ट्रॅक्टर मनमीत अरोरा सहा महिने पोलिसांना चकवा देत होता.रविवारी झालेल्या चौकशीत त्याने मान्य केले की, तरुणी आणि महाराजांचे संबंध होते. १३ मे रोजी तो तरुणीला घेऊन महाराजांसोबत गुजरातमध्ये गेला होता. अरोराने सरकारी साक्षीदार बनण्यास सहमती दिली आहे.
‘त्या’तरुणीने भय्यू महाराजांवर टाकले होते जाळे
By ऑनलाइन लोकमत | Published: January 02, 2019 6:11 AM